कधीही न तुटणा-या ‘Shatterproof’ डिस्प्लेसह लाँच केला Moto X Force

कधीही न तुटणा-या ‘Shatterproof’ डिस्प्लेसह लाँच केला Moto X Force
HIGHLIGHTS

मोटोरोला ड्रॉईड टर्बो२ च्या आंंतरराष्ट्रीय प्रकारात कंपनीने नवीन स्मार्टफोन Moto X Force लाँच केला आहे. ज्याला कधीही न तुटणा-या QHD डिस्प्लेसह बाजारात आणले आहे.

मोटोरोलाने गुरुवारी आपला नवीन स्मार्टफोन Moto X Force लाँच केला आहे. हा स्मार्टफोन हल्लीच लाँच झालेल्या मोटोरोला ड्रॉईड टर्बो २चे आंतरराष्ट्रीय स्वरुप आहे. ह्या स्मार्टफोनला सध्या UK सह लॅटिन अमेरिका, EMEA आणि APAC मध्ये लाँच केले आहे आणि हा ह्या सर्व ठिकाणी नोव्हेंबरपासून मिळण्यास सुरुवात होईल.

मोटोरोलाने आपल्या UK च्या ब्लॉगवर घोषणा करत असे सांगितले आहे की, ह्याच्या ३२जीबी स्मार्टफोनची किंमत GBP 499(जवळपास ४९,९०० रुपये) आणि ६४जीबी स्मार्टफोनची किंमत GBP 534(जवळपास ५३,४०० रुपये) ठेवण्यात आली आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये ५.४ इंचाची QHD १४४०x२५६० पिक्सेल डिस्प्ले दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, ह्याची डिस्प्ले ‘Shatterproof’ आहे, ज्याला तोडता येऊ शकत नाही. याचाच अर्थ ह्याचा डिस्प्ले जर आपण उंचावरुन फेकला तरीही ह्याचा डिस्प्ले तुटणार नाही. ह्या डिस्प्लेला अॅल्युमिनियम रिजिड कोरने बनवले आहे. त्याचबरोबर ही फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्युल लेयर टचस्क्रीन पॅनलने बनलेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन वॉटर-रिपलेंट नॅनो कोटिंगसह येईल.

स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 2GHz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB ची LPDDR4 रॅम मिळत आहे. आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे हा स्मार्टफोन आपल्याला ३२ जीबी आणि ६४जीबी अशा दोन प्रकारांत मिळेल. आणि ह्या दोन्ही प्रकारात आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने २टीबीपर्यंत वाढवू शकता. स्मार्टफोनमध्ये 3760mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आणि कंपनीचा असा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली बॅटरी मिक्स वापरल्यानंतरसुद्धा २ दिवस बॅटरी बॅकअप देते. आणि बॅटरी त्वरित चार्ज करण्यासाठी सुद्धा सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सलेचा रियर कॅमेरा f/2.0 अपर्चरसह ड्यूल-LED फ्लॅशसह मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये फेज डिटेक्ट ऑटोफोकस, त्याशिवाय ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा f/2.0 अपर्चरसह लाँच झाला आहे.

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉपवर चालतो. मात्र ही आश्चर्याची गोष्ट आहे की, ह्यात अॅनड्रॉईड ६.० मार्शमॅलो सपोर्ट नाही. हा फोन 4G LTE ला सपोर्ट करतो.

 

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo