इस्त्राइलच्या स्टार्टअप सिरिन लॅब्सने आपला नवीन हाय-एंड स्मार्टफोन १४,००० डॉलरच्या किंमतीत लाँच केला आहे. ह्याची भारतीय रुपयांनुसार, ह्याची किंमत जवळपास ९ लाखांपेक्षाही जास्त आहे. हा अॅनड्रॉईड स्मार्टफोन चिप-टू-चिप 256-बिट एन्क्रिप्शन देण्याचे खात्री देतो, जसे की मिलिट्रीच्या कम्युनिकेशनसाठी होते. ह्याला “स्मार्टफोन्सचे रोल्स रॉयस” बोलले जात आहे. ह्या स्मार्टफोनचे खरे नाव आहे सोलारिन. ह्याला मंगळवारी लंडनमध्ये लाँच केले.
हेदेखील वाचा – २०,००० च्या किंमतीत येणारे आकर्षक स्मार्टफोन्स (मे २०१६)
ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्यात 23.8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 5.5 इंचाची IPS LED 2K रिझोल्युशन डिस्प्ले मिळत आहे. कंपनीनुसार, ह्या स्मार्टफोनला जगातील सर्वात खास मटेरियलने बनवले गेले आहे. त्याचबरोबर ह्यात अॅडव्हान्स प्रायव्हसी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कंपनीनुसार, ह्या प्रायव्हसीसाठी जास्तीत जास्त चांगले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – भारतात लाँच होण्याआधीच सेलसाठी उपलब्ध झाला LeEco Le 2 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – यू यूनिकॉर्न विरुद्ध शाओमी रेडमी नोट 3: कोणता स्मार्टफोन आहे सरस