ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल सुरु आहे. Flipkart वर हा सेल 24 मे पासून सुरू झाला असून 29 मे पर्यंत असणार आहे. या काळात कंपनी स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. जर तुम्ही Apple iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, सेलदरम्यान आयफोनवर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसह अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत. चला तर मग Apple iPhone 13, iPhone 12 आणि iPhone 11 वर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात…
Apple iPhone 13 च्या 128GB वेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. परंतु 6 % डिस्काउंटनंतर तुम्हाला हा फोन 74,900 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, HDFC क्रेडिट कार्डधारकांना क्रेडिट आणि डेबिट EMI व्यवहारांवर 4,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. त्याबरोरबच, फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर 5 % कॅशबॅक देखील मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या किंवा आताच्या फोनसाठी जास्तीत जास्त 33,000 रुपयांची सूट घेतली जाऊ शकते, जी तुम्ही एक्सचेंजमध्ये ऑफर करत असलेल्या फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असेल. सर्व ऑफरनंतर, iPhone 13 ची प्रभावी किंमत 37,900 रुपयांपर्यंत कमी होईल.
Apple iPhone 12 च्या 128GB वेरिएंटची किंमत 70,900 रुपये आहे. परंतु 12% सूट मिळाल्यानंतर हा फोन तुम्हाला 61,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच, RBL क्रेडिट कार्डधारकांना क्रेडिट आणि डेबिट EMI व्यवहारांवर 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या किंवा आताच्या फोनसाठी जास्तीत जास्त 30,000 रुपयांची सूट घेतली जाऊ शकते, जी तुम्ही एक्सचेंजमध्ये ऑफर करत असलेल्या फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असेल.
Apple iPhone 11 च्या 64GB वेरिएंटची किंमत 49,900 रुपये आहे. परंतु 11% सवलतीनंतर हा फोन तुम्हाला 43,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफरमध्ये RBL क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 10% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. त्याबरोबरच, फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या किंवा आताच्या फोनसाठी जास्तीत जास्त 30,000 रुपयांची सूट घेतली जाऊ शकते, जी तुम्ही एक्सचेंजमध्ये ऑफर करत असलेल्या फोनच्या वर्तमान स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असेल.