आता OnePlus 12 चा फर्स्ट लूक OnePlus ने समोर आणला आहे.
OnePlus 12 फोन 4 डिसेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे.
फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील असेल, ज्यासह hasselblad ब्रँडिंग देण्यात येईल.
बऱ्याच दिवसांपासून प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus च्या आगामी स्मार्टफोनची चर्चा आणि प्रतीक्षा टेक विश्वात सुरु आहे. आगामी स्मार्टफोनबद्दल अनेक बातम्या आणि लीक्स पुढे आले आहेत. दरम्यान, आता OnePlus 12 चा फर्स्ट लूक OnePlus ने समोर आणला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 4 डिसेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे. होय, कंपनी 10 व्या वर्धापन दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमादरम्यान हा फोन लाँच करेल, असे म्हटले जात आहे.
नुकतेच पुढे आलेल्या अहवालातून असे समजले की, OnePlus 12 ची प्री-बुकिंग कंपनीच्या अधिकृत साइट आणि JD.com वर देखील उपलब्ध आहे. वाचा सविस्तर-
OnePlus 12 चा फर्स्ट लुक
प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने OnePlus 12 चा फर्स्ट लुक आपल्या अधिकृत X म्हणजे ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे. पुढे आलेल्या फर्स्ट लुकनुसार, या आगामी फोनमध्ये होल-पंच डिस्प्ले डिझाइन असणार आहे. फोनमधील कलर ऑप्शन्स पाहिल्यास, या फोनमध्ये पेल ग्रीन, रॉक ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन्स मिळू शकतात.
याशिवाय, फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील असेल, ज्यासह hasselblad ब्रँडिंग देण्यात येईल. फोनमधील पंच-होल कटआउटमध्ये सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल देखील बघायला मिळत आहे.
OnePlus 12 चे अपेक्षित तपशील
आतापर्यन्त पुढे आलेल्या लीकनुसार, OnePlus 12 मध्ये BOE चा ProXDR डिस्प्ले मिळेल, जो 2K रिझोल्यूशनसह येईल. याशिवाय, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणे अपेक्षित आहे. हा फोन Android 14 वर आधारित colorOS वर लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 5400mAh बॅटरी असणार आहे, जी 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगने सुसज्ज असणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.