10.or D2 स्मार्टफोन मोठया डिस्प्ले आणि 3GB रॅम सह झाला लॉन्च, बघा किंमत

10.or D2 स्मार्टफोन मोठया डिस्प्ले आणि 3GB रॅम सह झाला लॉन्च, बघा किंमत
HIGHLIGHTS

10.or D2 स्मार्टफोन एक अमेजॉन स्मार्टफोन म्हणून दोन वेगवेगळ्या स्टोरेज आणि रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोन ची बेस किंमत Rs 6,999 आहे.

10.or D2 भारतात एक अमेजॉन स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी ने भारतात 10.or G, 10.or E, 10.or D इत्यादी लॉन्च केले आहेत. आणि आता कंपनी ने एक नवीन स्मार्टफोन 10.or D2 लॉन्च केला आहे. पण भारतात आज फक्त हा एकच स्मार्टफोन लॉन्च झालेला नाही. आज भारतात Samsung Galaxy Note 9, आणि Xiaomi चा POCO F1 स्मार्टफोन पण येणार आहे. 

10.or D2 बद्दल बोलायचे तर या डिवाइस ची सर्वात मोठी खासियत यातील 5.45-इंचाचा एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. तसेच यात 3GB रॅम मिळत आहे. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर वर चालतो. फोन मध्ये एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 

किंमत पाहता हा डिवाइस वेगवेगळ्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या डिवाइस चा 2GB आणि 16GB स्टोरेज वेरिएंट Rs 6,999 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, तसेच याचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज फक्त Rs 7,999 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. डिवाइस तुम्ही दोन रंगात घेऊ शकता. 

हा बियॉन्ड ब्लॅक आणि ग्लो गोल्ड रंगात विकत घेऊ शकता. हा डिवाइस 28 ऑगस्ट पासून विकत घेऊ शकता. जर तुम्ही अमेजॉन प्राइम मेंबर असाल तर तुम्ही हा डिवाइस 27 ऑगस्ट ला होणार्‍या एका सेल मधून विकत घेऊ शकता. 

हा डिवाइस विकत घ्यायचा असेल तर पंजाब नॅशनल बँक च्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड ने विकत घेतल्यास तुम्हाला 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळेल, तसेच IndusInd बँक चा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला Rs 1,000 चा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. जियो कडून फोन सोबत तुम्हाला Rs 2,200 चा कॅशबॅक देण्यात येत आहे. 

नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo