Affordable! लेटेस्ट TECNO Spark 20C फोन भारतात 16GB RAM सह लाँच, किंमत 8 हजारांपेक्षा कमी। Tech News 

Affordable! लेटेस्ट TECNO Spark 20C फोन भारतात 16GB RAM सह लाँच, किंमत 8 हजारांपेक्षा कमी। Tech News 
HIGHLIGHTS

TECNO Spark 20C स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच

कंपनीने TECNO SPARK 20C हा फोन 8,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे.

TECNO Spark 20C फोनवर 1000 रुपयांची डिस्काउंट ऑफर देखील मिळेल.

Tecno च्या लेटेस्ट TECNO Spark 20C स्मार्टफोनबद्दल बरेच दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता अखेर TECNO Spark 20C स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच झाला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी या टेक्नो फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात TECNO Spark 20C ची किंमत आणि सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: Samsung ने सादर केली अनोखी Galaxy Ring, हृदयापासून झोपेपर्यंत लक्ष ठेवणाऱ्या सर्व Important Health फीचर्ससह लाँच। Tech News

Tecno Spark 20C
Tecno Spark 20C

TECNO Spark 20C ची किंमत

कंपनीने TECNO SPARK 20C हा फोन 8,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. या किंमतीत हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनवर लॉन्चिंग ऑफर्ससुद्धा मिळणार आहेत. फोनवर 1000 रुपयांची डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे, ज्यासह हा फोन 7,999 रुपयांना खरेदी करता येईल. कंपनी या फोनसोबत OTTPlay वार्षिक सबस्क्रिप्शन देते, ज्याची किंमत 5,604 रुपये आहे.

उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 5 मार्चपासून सुरू होईल. हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वरून खरेदी करता येईल. त्याबरोबरच, फोन मॅजिक स्किन ग्रीन, अल्पेन्ग्लो गोल्ड, मिस्ट्री व्हाईट आणि ग्रॅव्हिटी ब्लॅक कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.

Tecno Spark 20C चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 20C फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. सुरळीत कामकाजासाठी हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. त्याबरोबरच, यात 8GB व्हर्चुअल रॅम सपोर्टही उपलब्ध आहे. सिक्योरिटीसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा रियर कॅमेरा दिलेला आहे. यासोबत ड्युअल-एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh असून 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे. हा फोन Android 13 आधारित HiOS वर कार्य करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo