Tecno Spark GO 2024 बजेट रेंज स्मार्टफोन भारतात लाँच, iPhone सारख्या फिचरसह किंमतही कमी। Tech News

Updated on 04-Dec-2023
HIGHLIGHTS

'भारत का अपना स्पार्क' टॅगलाइनसह Tecno चा नवा स्मार्टफोन लाँच

Tecno ने भारतीय वापरकर्त्यांसाठी Tecno Spark GO 2024 स्मार्टफोन लाँच केला आहे.

Tecno Spark GO 2024 ची सुरुवातीची किंमत फक्त 6,699 रुपये आहे.

Tecno ने भारतीय वापरकर्त्यांसाठी Tecno Spark GO 2024 स्मार्टफोन लाँच केला आहे. ‘भारत का अपना स्पार्क’ या टॅगलाइनसह कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट श्रेणीमध्ये लाँच केला आहे. या किमतीत ग्राहकांना 90Hz डॉट इन डिस्प्ले, iPhone सारखे डायनॅमिक पोर्ट फीचर इ. फीचर्स देण्यात मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता Tecno Spark GO 2024 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.

Tecno Spark GO 2024 ची किंमत

Tecno Spark GO 2024 ची सुरुवातीची किंमत फक्त 6,699 रुपये इतकी आहे. हा फोन प्रसिद्ध शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. तर, फोनची विक्री 7 डिसेंबरपासून Amazon आणि रिटेल आउटलेटवर सुरू होणार आहे.

डिव्हाइसमध्ये 3GB RAM + 64GB अंतर्गत स्टोरेज आहे. यासोबतच 3GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्टही आहे, जो वापरकर्त्यांना अतिरिक्त रॅमची सुविधा देतो. हा फोन ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि मिस्ट्री व्हाईट अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

Tecno Spark GO 2024

Tecno SPARK GO 2024 मध्ये 6.56 इंच लांबीचा डॉट-इन डिस्प्ले आहे, ज्यात विशेष 90Hz रिफ्रेश रेट आणि पांडा स्क्रीन प्रोटेक्शन मिळेल. विशेष म्हणजे फोनमध्ये डायनॅमिक पोर्ट फीचर देण्यात आले आहे, जे iPhone मॉडेल्ससाठी प्रसिद्ध आहे. या फिचरच्या मदतीने कॉलर ID, चार्जिंग आणि इतर अनेक माहिती डिस्प्ले पॅनलच्या वरच्या पिल शेपच्या बारमध्ये दिसेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T606 चिपसेट आहे.

कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि AI कॅमेरा LED फ्लॅशसह उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा लेन्स आहे. डिव्हाइस वापरकर्त्यांना 5000mAh बॅटरीचे समर्थन प्रदान करते.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनने फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल DTS स्पीकर, ड्युअल सिम 4G, Wi-Fi, ब्लूटूथ अशा अनेक फीचर्ससह बाजारात प्रवेश केला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :