Tecno Spark Go 2024 मध्ये मिळेल iPhone सारखा Special फिचर, Amazon लिस्टिंगमधून किंमत देखील जाहीर। Tech News
Tecno Spark Go 2024 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे.
या फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट ई-कॉमर्स दिग्गज Amazon वर सूचीबद्ध झाला आहे.
Tecno चा हा फोन भारतात 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल.
Tecno Spark Go 2024 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. हा फोन या वर्षी जानेवारीमध्ये लाँच झालेल्या Tecno Spark Go 2023 चा सक्सेसर असेल, असे म्हटले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात लाँच होण्यापूर्वी या फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट ई-कॉमर्स दिग्गज Amazon वर सूचीबद्ध झाली आहे. या साइटद्वारे फोनची लॉन्चिंग, फीचर्स आणि किंमतीशी संबंधित माहितीही समोर आली आहे.
हे सुद्धा वाचा: Good News! अलीकडेच लाँच झालेला OnePlus Nord CE 3 5G फोन झाला स्वस्त, नवीन किंमत साइटवर Live| Tech News
Tecno Spark Go 2024 Amazon Listing किंमत
Amazon वर सूचिबद्ध असलेल्या मायक्रोसाईटनुसार, Tecno चा हा फोन भारतात 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल. पूर्वी कंपनीने 6,999 रुपयांच्या किंमतीत Tecno Spark Go 2023 फोन सादर केला होता. Amazon सूचीनुसार, फोनमध्ये Mystery White आणि Gravity Black असे दोन कलर ऑप्शन्स असतील.
Tecno Spark Go 2024 Amazon Listing स्पेसिफिकेशन्स
Amazon लिस्टिंगद्वारे फोनच्या फीचर्सचा तपशील समोर आला आहे. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येईल. फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच-होल कटआउट दिले जाईल. हा पंच-होल कटआउट Apple iPhone च्या डायनॅमिक आयलँडप्रमाणे काम करेल. यामध्ये स्मार्टफोन नोटिफिकेशन्स सारखी माहिती तुम्हाला दिसेल. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.
याशिवाय, हा फोन Unisoc T606 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज असेल, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात येईल अशी अपेक्षा आहे. फोटोग्राफीसाठी, Tecno Spark Go 2024 फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा मिळेल. फोनच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये LED फ्लॅश देखील ठेवला जाईल. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile