5000mAh बॅटरीसह नवीनतम Tecno Spark Go 1 भारतात लाँच, किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी

Updated on 29-Aug-2024
HIGHLIGHTS

Tecno ने आपला नवा Tecno Spark Go 1 स्मार्टफोन भारतात लाँच केला.

Tecno Spark Go 1 फोनची विक्री Amazon वर 3 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार

Tecno Spark Go 1 मध्ये AI ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन, ड्युअल स्पीकर आणि स्पष्ट ऑडिओसाठी इन्फ्रारेड सेन्सर आहे.

बजेट स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध असेलेली स्मार्टफोन निर्माता Tecno ने आपला नवा Tecno Spark Go 1 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. कंपनीने हा फोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या नव्या फोनची विक्री सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात मोठ्या डिस्प्लेसह पॉवरफुल प्रोसेसर आहे. हा फोन AI Active Noise Cancellation फीचरसह येतो. जाणून घेऊयात Tecno Spark Go 1 फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Price Cut! 50MP सेल्फी कॅमेरासह Motorola Edge 50 Ultra 5G फोन स्वस्त झाला, तब्बल 5000 रुपयांची कपात

Tecno Spark Go 1 ची किंमत आणि उपलब्धता

लेटेस्ट Tecno Spark Go 1 स्मार्टफोनची किंमत 7,299 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, नव्या Tecno Spark Go 1 फोनची विक्री Amazon वर 3 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. वेबसाईटवर याचे पेज देखील लाईव्ह झाले आहे. हा फोन लाइम ग्रीन, ग्लिटरी व्हाईट आणि स्टारट्रेल ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Tecno Spark Go 1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark Go 1 फोन नुकतेच जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा IPS LCD HD+ स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या रिफ्रेश रेटसह सेगमेंटमधील हा पहिला स्मार्टफोन आहे, असे सांगितले जात आहे. या फोनमध्ये AI ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन, ड्युअल स्पीकर आणि स्पष्ट ऑडिओसाठी इन्फ्रारेड सेन्सर आहे. फोनला पाणी आणि धुळीपासून वाचवण्यासाठी IP54 रेटिंग आहे.

फोनमध्ये 4GB रॅम आहे. मात्र, व्हर्च्युअल रॅमच्या सपोर्टने ते 8GB पर्यंत वाढवता येते. हा हँडसेट 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. फोनच्या मध्यभागी सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13MP मेन कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :