Tecno चा नवा स्मार्टफोन लाँच, 50MP कॅमेरा आणि 7GB RAM सह किंमत 10 हजारांपेक्षा कमी

Tecno चा नवा स्मार्टफोन लाँच, 50MP कॅमेरा आणि 7GB RAM सह किंमत 10 हजारांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Tecno Spark 9T स्मार्टफोन लाँच

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध

फोनच्या 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,299 रुपये

स्मार्टफोन ब्रँड Tecno ने भारतीय बाजारपेठेत आपला नवीन एंट्री लेव्हल फोन Tecno Spark 9T लाँच केला आहे. हा फोन 10 हजारांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी आहे. MediaTek Helio G35 प्रोसेसर Tecno Spark 9T मध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 7 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध आहे. सिक्युरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती…  

हे सुद्धा वाचा :  5000mAh बॅटरी आणि अप्रतिम फीचर्ससह Infinix चा नवा फोन आज होणार लाँच, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी

Tecno Spark 9T किंमत

Tecno Spark 9T चार कलर ऑप्शन्समध्ये Turquoise Cyan, Atlantic Blue, Iris Purple, Tahiti Gold लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,299 रुपये आहे. हा फोन लवकरच ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.  

tecno spark 9t

Tecno Spark 9T चे स्पेसिफिकेशन्स 

Tecno Spark 9T मध्ये वॉटर ड्रॉप नॉच आणि 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये Octacore MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि 4 GB RAM आहे. 3 GB व्हर्च्युअल रॅमसह फोनची RAM 7 GB पर्यंत वाढवता येते. फोनला वॉटर रेझिस्टंटसाठी IPX2 रेटिंग मिळाले आहे. सिक्युरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट देखील मिळतो.

 

 

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा AI प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. यात सुपर नाईट मोड आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरामध्ये ड्युअल फ्लॅश लाइट देखील उपलब्ध आहे.

Tecno Spark 9T मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की, ही एका तासापेक्षा कमी वेळात 50 टक्के चार्ज होऊ शकते. फोनमध्ये 39 दिवसांचा स्टँडबाय मोड आणि 147 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाइम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन GPS, Wi – Fi, ब्लूटूथ, FM सह OTG सपोर्ट मिळतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo