TECNO Spark 30C 5G अखेर भारतीय बाजारात लाँच, AI कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स

TECNO Spark 30C 5G अखेर भारतीय बाजारात लाँच, AI कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स
HIGHLIGHTS

Tecno चा नवीनतम Tecno Spark 30C 5G फोन भारतीय बाजारात लाँच

TECNO Spark 30C 5G फोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये

TECNO Spark 30C 5G मध्ये 48MP प्राथमिक लेन्स आणि दुसरी AI लेन्स उपलब्ध आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno चा Tecno Spark 30C 5G भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा नवा हँडसेट बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. कमी किमतीत या फोनमध्ये भारी पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. या मोबाईल फोनमध्ये HD+ डिस्प्ले, AI कॅमेरा आणि MediaTek Dimensity 6300 चिपसेट आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात TECNO Spark 30C 5G ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: OnePlus Festive Sale: स्मार्टफोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा वर्षाव,पहा Discount ऑफर्स

tecno spark 30c 5g

TECNO Spark 30C 5G ची किंमत

TECNO Spark 30C 5G फोन 4GB + 64GB आणि 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,499 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा हँडसेट ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट FIipkart वरून खरेदी करता येईल. स्मार्टफोन कंपनी Tecno चा हा स्मार्टफोन मिडनाईट शॅडो, अरोरा क्लाउड आणि अझूर स्काय कलर ऑप्शन्ससह येतो.

TECNO Spark 30C 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Techno Spark 30C 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 octa-core प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, फोन 4GB रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो. त्याबरोबरच, हा मोबाइल फोन Android 14 आधारित HiOS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल.

tecno spark 30c 5g

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. त्याबरोबरच, यात 48MP प्राथमिक लेन्स आणि दुसरी AI लेन्स उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे, त्यासह ड्युअल LED फ्लॅश लाईट उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात फेस अनलॉक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, स्टिरीओ स्पीकर आणि डॉल्बी ATMOS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo