आगामी Tecno Spark 20C चे भारतीय लाँच Confirm! किंमत 8000 रुपयांअंतर्गत असण्याची अपेक्षा। Tech News

Updated on 20-Feb-2024
HIGHLIGHTS

Tecno Spark 20C भारतात लवकरच लाँच होईल.

हा स्मार्टफोन मार्च महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो.

या मोबाईलची किंमत सुमारे 8 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

भारतात Tecno Spark 20 लाँच केल्यानंतर आता कंपनी भारतीय बाजारात Tecno Spark 20C याहून स्वस्त मॉडेल सादर करणार आहे. Tecno Spark 20C भारतात लवकरच लाँच होईल, अशी अधिकृत घोषणा ब्रँडकडून करण्यात आली आहे. मात्र, सध्या फोनची लाँच डेट समोर आलेली नाही. पण लीकनुसार हा स्मार्टफोन मार्च महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात लाँच होण्याआधी हा स्मार्टफोन आधीच ग्लोबली लाँच झाला आहे. चला तर मग या फोनची अंदाजे किंमत आणि ग्लोबल स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात-

हे सुद्धा वाचा: JioBharat B2: UPI पेमेंटसाठी लवकरच Jio चा नवा Affordable फीचर फोन होणार लाँच, मिळेल 4G कनेक्टिव्हिटी। Tech News

Tecno Spark 20C ची अपेक्षित भारतीय किंमत

Tecno Spark 20C हा बजेट रेंजमध्ये येईल. हा स्मार्टफोन भारतात अतिशय कमी किमतीत लाँच केला जाणार आहे, असे म्हटले जात आहे. या मोबाईलची किंमत सुमारे 8 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. Tecno Spark 20C भारतात 7,499 रुपये किंवा 7,999 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो.

Tecno Spark 20C

Tecno Spark 20C चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

Techno Spark 20C स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत 6.6-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन Octacore MediaTek Helio G36 प्रोसेसरने सज्ज आहे आणि हाच प्रोसेसर भारतीय व्हेरिएंटमध्येही आणला जाईल, असे म्हटले जात आहे. कंपनीने 4GB आणि 8GB रॅममध्ये फोन सादर केला आहे. यामध्ये विस्तारित रॅमचे सपोर्ट देखील मिळणार आहे. आवश्यकता असल्यास हा फोन 16GB रॅमवर ​​परफॉर्म करू शकतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. त्याच्या मागील पॅनलवर 50MP प्रायमरी सेन्सरसह सेकंडरी AI लेन्स उपलब्ध आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर ड्युअल फ्लॅशसह सुसज्ज 8MP सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, Tecno Spark 20C स्मार्टफोन 5000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :