Tecno Spark 20 ची पहिली सेल भारतात आज म्हणजेच 2 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात हा परवडणारा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर, आता हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. यात दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीसह पॉवरफुल प्रोसेसर आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनची किंमत आणि पहिल्या सेलमधील सर्व ऑफर्स-
हे सुद्धा वाचा: आगामी Nothing Phone (2a) चे भारतीय लाँच अखेर कन्फर्म! फोन Flipkart वर सूचीबद्ध, बघा सर्व डिटेल्स। Tech News
Tecno Spark 20 ची किंमत 10,499 रुपयांपासून सुरू होते. या फोनच्या टॉप 8GB रॅमसह 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. यात आहे. दरम्यान, फोनचा बेस व्हेरिएंट 128GB स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन सायबर व्हाईट, ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि मॅजिक स्किन ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर आजपासून स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. Tecno Spark 20 वर उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची झटपट सूट मिळत आहे. तसेच, फोनसोबत OTT प्ले सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 5,604 रुपये आहे. या मेम्बरशिपमध्ये Sony LIV, Zee5 यासह इतर 23 OTT ॲप्सचे ऍक्सेस मिळेल. Buy From Here
Tecno Spark 20 मध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये Mediatek Helio G85 प्रोसेसर आहे. हे Android 13 वर आधारित HiOS 13 वर चालते. स्टोरेज वाढवण्यासाठी फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड उपलब्ध आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फेस अनलॉक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि DTS सक्षम ड्युअल स्पीकर आहेत.
स्मार्टफोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. मागील बाजूस फोटोग्राफीसाठी 50MP मुख्य कॅमेरा आणि AI लेन्स देण्यात आली आहे. तसेच, ड्युअल LED फ्लॅश उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी फोन 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, जो 18W फास्ट चार्जिंगसह येतो.