108MP कॅमेरासह येणाऱ्या Tecno Spark 20 Pro 5G ची भारतात पहिली सेल आज, मिळतेय तब्बल 2000 रुपयांची सूट
Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच करण्यात आला आहे.
Tecno Spark 20 Pro 5G फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 11 जुलै 2024 पासून सुरु होणार
पहिल्या सेलमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno चा नवा Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोन या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच करण्यात आला. त्यानंतर, या फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 11 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन अनेक बंपर ऑफर्ससह खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon च्या माध्यमातून केली जाणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Tecno Spark 20 Pro 5G चे पहिल्या सेलमधील ऑफर्स-
Also Read: एअर जेश्चरसह येणाऱ्या Realme स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सूट, Best ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
Tecno Spark 20 Pro 5G वरील ऑफर्स
वर सांगितल्याप्रमाणे, Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोनची पहिली सेल Amazon वर आज दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. फोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 15,999 रुपये आणि 16,999 रुपये इतकी आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध असेल. या ऑफरसह हा फोन 13,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Startrail Black आणि Glossy White कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. येथून खरेदी करा
Tecno Spark 20 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 20 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा LTPS FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि टच सॅम्पलिंग रेट 240hz सह सादर करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये ड्युअल स्पीकर, डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट, हेडफोन जॅक आणि 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळेल.
फोटोग्राफीसाठी, Tecno Spark 20 Pro 5G फोन मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 108MP मुख्य कॅमेरा आणि 2MP सुपर मॅक्रो लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 33W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. हे 32 मिनिटांत 50% चार्ज होते. त्याबरोबरच, या फोनमध्ये 10W रिव्हर्स चार्जिंगचे समर्थन उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile