108MP कॅमेरासह Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन
Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच
Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोनची किंमत लाँच सवलतीसह 13,999 रुपयांना मिळेल.
Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोनची विक्री 11 जुलै 2024 पासून Amazon वर सुरू होईल.
Tecno Spark 20 Pro 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno Spark 20 Pro 5G च्या भारतीय लाँचची चर्चा टेक विश्वात सर्वत्र सुरु होती. अखेर आज हा स्मार्टफोन भारतात पॉवरफुल फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. मुख्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आहे. तर, फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. चला तर मग जाणून घेऊयात Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स.
Also Read: WhatsApp वर येणार महत्त्वाचे अपडेट! Meta AI होणार आणखी ऍडव्हान्स, तुमचा फोटो सहज करेल Edit
Tecno Spark 20 Pro 5G ची भारतीय किंमत
लेटेस्ट Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोनची किंमत लाँच सवलतीसह 13,999 रुपये इतकी असेल. म्हणजेच, फोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यावर 2,000 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनची विक्री 11 जुलै 2024 पासून लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सुरू होईल.
Tecno Spark 20 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 20 Pro 5G मोबाईलमध्ये वापरकर्त्यांना 6.78 इंच लांबीचा फुल HD + LCD डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट उपलब्ध आहे. यासोबतच, डिस्प्लेमध्ये युजर्सना फ्रंट पॅनलवर पंच होल डिझाइन मिळणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये MediaTek Dimension 6080 octa core प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम असून 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. इतकेच नाही तर, अंतर्गत स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड स्लॉटची सुविधा देखील देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 108MP अल्ट्रा सेन्सिंग प्राइमरी कॅमेरा इन्स्टॉल करण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात 2MP ची आणखी एक लेन्स मिळेल. तसेच, वापरकर्त्यांना आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा लेन्स मिळतील. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी वापरकर्त्यांना दीर्घ बॅकअप देते. फोन चार्ज करण्यासाठी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile