आगामी Tecno Spark 20 स्मार्टफोन Amazon वर सूचीबद्ध, किंमत आणि Special फीचर्स झाले उघड। Tech News 

आगामी Tecno Spark 20 स्मार्टफोन Amazon वर सूचीबद्ध, किंमत आणि Special फीचर्स झाले उघड। Tech News 
HIGHLIGHTS

Tecno Spark 20 लवकरच भारतात लाँच होण्यासाठी सज्ज

लाँच होण्यापूर्वी आगामी स्मार्टफोनचे पेज Amazon वर लाईव्ह केले गेले आहे.

Tecno Spark 20 ची किंमत 10,499 रुपयांच्या आत असेल.

Tecno Spark 20 लवकरच भारतात लाँच होणार आहे. अलीकडेच, कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच Twitter अकाउंटद्वारे स्मार्टफोन टीज केले होते. यासह, भारतात त्याचे लॉन्चिंग निश्चित झाले आहे. आता हा स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनचा फोटोदेखील देण्यात आले आहे, ज्यावरून फोनचे डिझाइन समोर आले आहे. एवढेच नाही तर मायक्रो वेबसाईटवर फोनचे खास फीचर्स सांगण्यात आले आहेत.

एवढेच नाही तर, लाँच होण्यापूर्वीच Amazon पेजवर फोनची किंमत देखील देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि उघड झालेले स्पेक्स-

हे सुद्धा वाचा: आगामी Nothing Phone (2a) सर्टिफिकेशन साइटवर सूचीबद्ध, 45W फास्ट चार्जिंगसह करेल जबरदस्त Entry। Tech News

Tecno Spark 20 ची Amazon लिस्टिंग आणि अपेक्षित किंमत

आम्ही तुम्हाला सांगतो की, लिस्टिंगमध्ये Tecno Spark 20 स्मार्टफोनची लाँच तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, आगामी स्मार्टफोनचे पेज Amazon वर लाईव्ह केले गेले आहे. लक्षात घ्या की, Amazon पेजवर Coming Soon असे लिहिले आहे. Tecno Spark 20 ची किंमत 10,499 रुपयांच्या आत असेल, असे देखील या पेजवर नमूद केले आहे.

तसेच, फोनच्या खास फीचर्सची पुष्टी देखील या पेजद्वारे जाहीर करण्यात आली आहे. कंपनी लवकरच Tecno Spark 20 ची लाँच तारीख जाहीर करू शकते.

Tecno Spark 20 appears on Amazon ahead of India launch: Price, camera & more revealed

Tecno Spark 20 चे कन्फर्म फीचर्स

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon लिस्टिंगमध्ये फोनचे फीचर्स कन्फर्म करण्यात आले आहेत. त्यानुसार, Tecno Spark 20 स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह डॉट-इन डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये MediaTek Helio G85 SoC उपलब्ध आहे. फोन स्टीरिओ स्पीकर आणि IP53 रेटिंग सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन ग्रॅव्हिटी ब्लॅक, सायबर व्हाइट, निऑन गोल्ड आणि मॅजिक स्किन ब्लू या चार कलर ऑप्शन्ससह येईल.

स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅमसोबत स्मार्टफोनमध्ये 8GB विस्तारित रॅमचा पर्याय देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 256GB इंटर्नल स्टोरेज असेल, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये LED फ्लॅशसह 50MP मेन कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo