Tecno चा लेटेस्ट Tecno Spark 20 स्मार्टफोन भारतात लाँच
Tecno Spark 20 फोनची सुरुवातीची किंमत 10,499 रुपये निश्चित
डिस्प्लेमध्ये Apple iPhone सारखे 'डायनॅमिक पोर्ट' देण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला Tecno चा लेटेस्ट Tecno Spark 20 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. हा फोन बजेट विभागात लाँच करण्यात आला आहे. फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये Apple च्या iPhone प्रमाणे ‘डायनॅमिक पोर्ट’ आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP बॅक आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील-
Tecno Spark 20 ची भारतीय किंमत
कंपनीने Tecno Spark 20 फोनची सुरुवातीची किंमत 10,499 रुपये निश्चित केली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या टेक्नो फोनची सेल Amazon वर येत्या 2 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. हा फोन नियॉन गोल्ड, सायबर व्हाईट आणि मॅजिक ब्लू हे तीन कलर ऑप्शनसह सादर करण्यात आले आहेत.
Tecno Spark 20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीने Tecno Spark 20 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. यासोबतच वर सांगितल्याप्रमाणे, डिस्प्लेमध्ये Apple iPhone सारखे ‘डायनॅमिक पोर्ट’ देण्यात आले आहे, ज्यामध्ये फोनच्या नोटिफिकेशन्स, बॅटरी, म्युझिक इ. सर्व दिसतील. स्मूथ फंक्शनिंगसाठी हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन Android 13 वर काम करतो. पाण्याच्या संरक्षणासाठी याला IP53 रेटिंग देण्यात आली आहे.
स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी फोनमध्ये 8GB RAM (+8GB व्हर्च्युअल रॅम) 16GB आणि 256GB स्टोरेज प्रदान करते. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबत फोनमध्ये ड्युअल LED फ्लॅश उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.