Tecno Spark 10 5G चे नवीन व्हेरिएंट लाँच, स्वस्तात मिळेल 16GB रॅम

Updated on 29-Apr-2023
HIGHLIGHTS

Tecno Spark 10 5G चा नवा व्हेरिएंट लाँच

या व्हेरिएंटची किंमत 15 हजार 499 रुपये

2 मे 2023 पासून Amazon वर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होणार

Tecno ने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी Tecno Spark 10 5G स्मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत लाँच केला आहे. आता कंपनीने या डिवाइसचा नवीन रॅम म्हणजे 16GB रॅम व्हेरिएंट लाँच केला आहे. या नवीन व्हेरिएंटची किंमत आणि फीचर्स बघुयात – 

Tecno Spark 10 5G चे स्पेसिफिकेशन्स

 हा नवीनतम फोन Android 13 वर आधारित HiOS 12.6 वर काम करतो. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा HD + डिस्प्ले आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 120 Hz आहे. फोनच्या नव्या म्हणजेच 16GB वेरिएंटमध्ये 8GB रॅम देण्यात आली असली तरी 8GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते.

अलीकडे, लाँच केलेल्या 8 GB रॅम वेरिएंटमध्ये 4 GB RAM सोबत 4 GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला होता. फोटोग्राफीसाठी AI लेन्ससह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मागील बाजूस उपलब्ध आहे. तर, समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.

 

https://twitter.com/TecnoMobileInd/status/1652209839869767681?ref_src=twsrc%5Etfw

 

किंमत :

16GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या व्हेरिएंटची किंमत 15 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14 हजार 499 रुपये आहे. 2 मे 2023 पासून Amazon वर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :