Tecno Pova 6 Pro ची Sale आजपासून भारतात सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स। Tech News 

Tecno Pova 6 Pro ची Sale आजपासून भारतात सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स। Tech News 
HIGHLIGHTS

Tecno Pova 6 Pro ची सेल आजपासून भारतात सुरु

Tecno Pova 6 Pro वर 2000 रुपयांची बँक सवलत दिली जात आहे.

या स्मार्टफोनमध्ये आर्क इंटरफेस नावाचा नोटिफिकेशन लाइट देखील मिळणार आहे.

Tecno Pova 6 Pro गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चच्या अखेरीस लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची डिझाईन अप्रतिम आहे. मुख्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन एक अनोख्या नोटिफिकेशन लाईटसह येतो. त्याबरोबरच, यात मीडियाटेकचा शक्तिशाली प्रोसेसर आणि 108MP कॅमेरा उपलब्ध आहे. आज म्हणजेच 4 एप्रिल रोजी या स्मार्टफोनची पहिली विक्री भारतात सुरु होणार आहे. बघुयात तपशील-

Tecno Pova 6 Pro 5G
Tecno Pova 6 Pro 5G

Tecno Pova 6 Pro ची किंमत आणि ऑफर्स

हा Tecno स्मार्टफोनची विक्री Amazon India वर सुरु झाली आहे. हा फोन दोन रॅम व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 12GB+256GB स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांना विकला जात आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 2000 रुपयांची बँक सवलत दिली जात आहे. याशिवाय हा फोन 1,067 रुपयांना मिळेल. त्याबरोबरच, या फोनवर तुम्हाला तब्बल 20,400 ची एक्सचेंज ऑफरदेखील मिळणार आहे. यासह तुम्ही हा फोन पहिल्या सेलमध्ये अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

Tecno Pova 6 Pro चे फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स

Tecno Pova 6 Pro 5G launched in India
Tecno Pova 6 Pro 5G launched in India

Tecno Pova 6 Pro ची डिझाईन आकर्षक आहे. या स्मार्टफोनमध्ये आर्क इंटरफेस नावाचा नोटिफिकेशन लाइट मिळणार आहे. तुम्ही हे आपल्या आवडीनुसार कस्टमाइज देखील करू शकता. स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच पंच-होल AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात उत्तम परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर मिळेल.

यामध्ये Z-axis linear मोटरसह व्हीसी कूलिंगचा सपोर्ट आहे, जो डिव्हाइस लवकर गरम होऊ देत नाही. याव्यतिरिक्त, हँडसेटमध्ये व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी यात पहिली 108MP, दुसरी 2MP आणि तिसरी ऑक्झिलरी लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. वापरकर्ते याद्वारे 4K व्हिडिओ देखील रेकॉर्ड करू शकतात. पॉवरसाठी फोनमध्ये 70W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 6,000mAh ची मजबूत बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo