108MP कॅमेरासह Tecno Pova 6 Neo 5G फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स 

108MP कॅमेरासह Tecno Pova 6 Neo 5G फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स 
HIGHLIGHTS

Tecno ने Tecno Pova 6 Neo 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला.

Tecno Pova 6 Neo 5G फोनची विक्री 14 सप्टेंबर 2024 रोजी Flipkart वर सुरू होईल.

Tecno Pova 6 Neo 5G स्मार्टफोनमध्ये 108MP AI कॅमेरा उपलब्ध आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने Tecno Pova 6 Neo 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर कंपनीने आता हा फोन लाँच केला आहे. फोनमध्ये बजेट किमतीत अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फोनमध्ये 108MP अल्ट्रा-क्लियर कॅमेरा मिळेल. याशिवाय, टेक्नोच्या या 5G फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले मिळत आहे. जाणून घेऊयात Tecno Pova 6 Neo 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती-

Also Read: Realme Pad 2 Lite च्या भारतीय लाँच डेटची पुष्टी! परवडणाऱ्या किमतीत लवकरच होणार लाँच, पहा डिटेल्स

Tecno Pova 6 Neo 5G ची भारतीय किंमत

Tecno Pova 6 Neo 5G स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते. स्पेशल लॉन्च ऑफर अंतर्गत, POVA 6 Neo 11,999 रुपयांना आणला गेला आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनच्या वेरिएंटची ही किंमत आहे. 8GB रॅम + 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.

tecno pova 6 neo 5g with ai features might launch soon

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 12:00 वाजतापासून Flipkart वर सुरू होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये या फोनवर 1000 रुपयांची सूट आणि 1000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. या ऑफरसह तुम्ही 12,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत फोन खरेदी करण्यास सक्षम असाल. TECNO POVA 6 Neo फोन मिडनाईट शॅडो, अझूर स्काय आणि अरोरा क्लाउड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

Tecno Pova 6 Neo 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Tecno च्या नवीन मोबाईल POVA 6 Neo 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसरसह येतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Tecno Pova 6 Neo 5G या फोनमध्ये 16GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ड्युअल सिम 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, इन्फ्रारेड सेन्सर, NFC, लाइट सेन्सर, AI सूट (AIGC, AI मॅजिक इरेजर, AI कटआउट, AI वॉलपेपर, AI आर्टबोर्ड, Ask AI) इ. फीचर्स देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये 108MP AI कॅमेरा आहे. हा फोन ड्युअल कलर फ्लॅश आणि AI सह येतो. 108MP AI कॅमेरा सह येणारा हा या विभागातील पहिला फोन आहे. या कॅमेरामध्ये 3X लॉसलेस सेन्सर झूमची सुविधा देखील देण्यात आली आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo