Tecno India ने आपला नवीन फोन Tecno Pova 3 भारतात लाँच केला आहे. Tecno Pova 3 हा 7000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह भारतातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा केला जातोय. याशिवाय Tecno Pova 3 मध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर असून ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU आणि 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे.
Tecno Pova 3 च्या 4 GB RAM सह 64 GB स्टोरेजची किंमत 11,499 रुपये आहे. त्याचप्रमाणे, 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 27 जूनपासून ऍमेझॉन इंडियावर इको ब्लॅक आणि टेक सिल्व्हर कलरमध्ये फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
हे सुद्धा वाचा : Koffee With Karan शो च्या नव्या सिझनचा टीझर रिलीज, Disney + Hotstar वर 'या' तारखेपासून होणार सुरु
Tecno Pova 3 मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेट आणि 1080×2460 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.9-इंच फुल HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU सह MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 6GB पर्यंत RAM सह 128GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये 11 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध असेल.
Tecno Pova 3 मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेलचा आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सल्स आणि तिसरी लेन्स AI आहे. रियर कॅमेरासह क्वाड फ्लॅश लाइट आहे. यात सेल्फीसाठी फ्लॅश लाइटसह 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. टेक्नोच्या या फोनच्या कॅमेऱ्यात AI कॅम, ब्युटी, पोर्ट्रेट, शॉर्ट व्हिडिओ आणि सुपर नाईट असे मोड उपलब्ध आहेत. यात ऑटो आयफोकस देखील आहे. कॅमेऱ्यासोबत डॉक्युमेंट स्कॅनरही देण्यात आला आहे.
या Tecno फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 7000mAh बॅटरी आहे. तुम्हाला हा चार्जर फोनसोबत बॉक्समध्ये मिळेल. 33-वॉट चार्जर 40 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज करेल. यात 10W रिव्हर्स चार्जिंग देखील आहे, म्हणजेच तुम्हाला या फोनसह इतर गॅजेट्सदेखील चार्ज करता येतील.