बजेट स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी TECNO ने अलीकडेच आपल्या नव्या TECNO POP 9 5G फोनची घोषणा केली होती. आता अखेर कंपनीने TECNO POP 9 5G फोन भारतात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने नवीनतम बजेट 5G स्मार्टफोन बजेट किमतीत सादर केला आहे. कमी किमतीत हा फोन अनेक जबरदस्त फीचर्ससह लाँच केला गेला आहे. जाणून घेऊयात TECNO POP 9 5G ची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
Also Read: Xiaomi 14 Offers: जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय हजारो रुपयांचा Discount, ऑफर्सचा होतोय भारी वर्षाव!
TECNO POP 9 5G या फोनच्या 4GB + 64GB मॉडेलची किंमत 9,499 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. हे स्मार्टफोन अगदी 10 हजार रुपयांअंतर्गत लाँच करण्यात आले आहेत. हा फोन मिडनाईट शॅडो, अझूर स्काय आणि अरोरा क्लाउड कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोन आता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon.in वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. फोनची खुली विक्री 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान हा फोन 1000 रुपयांच्या सवलतींसह मिळेल. या बॉक्समध्ये दोन अतिरिक्त बॅक पॅनल स्किनदेखील आहेत.
TECNO POP 9 5G फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये नोटिफिकेशन्ससाठी डायनॅमिक पोर्ट देखील उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Octa Core MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मेमरी फ्यूजनसह अतिरिक्त 4GB व्हर्च्युअल रॅमसह 4GB RAM आणि 64GB आणि 128GB स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. तर, फोन 4 वर्षांपेक्षा जास्त काळ लॅग-फ्री परफॉर्मन्स देईल, असे कंपनीने सांगितले आहे.
फोटोग्राफीसाठी, हा बजेट स्मार्टफोन 48MP Sony IMX582 सेन्सरसह येतो. त्याबरोबरच, यामध्ये AI लेन्ससह ड्युअल-एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 18W जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी फोन IP54 रेटिंगसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, NFC सपोर्टसह या विभागातील पहिला फोन आहे.