नवा TECNO POP 9 भारतात उत्तम फीचर्ससह लाँच! किंमत 7 हजारांपेक्षा कमी, पहा टॉप 5 फीचर्स
Tecno कंपनीचा नवा स्मार्टफोन TECNO POP 9 भारतात लाँच
Tecno Pop 9 ची किंमत 6,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
फोनची विक्री 26 नोव्हेंबरपासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर सुरू होईल.
बजेट स्मार्टफोन देण्यासाठी ओळखली जाणारी Tecno कंपनीचा नवा स्मार्टफोन TECNO POP 9 भारतात लाँच करण्यात आल आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, बजेट रेंजमध्ये हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे या किमतीत तुम्हाला या उपकरणात MediaTek Helio G50 प्रोसेसर आणि व्हर्च्युअल रॅम मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी, या हँडसेटमध्ये 13MP कॅमेरा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता TECNO POP 9 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.
Also Read: WhatsApp वर येणार नवे Voice Message Transcripts फिचर! व्हॉईसला टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करणे झाले सोपे
TECNO POP 9 ची भारतीय किंमत
#TECNOPOP9 makes you #LiveLimitless!
— TECNO Mobile India (@TecnoMobileInd) November 22, 2024
Feel the power with India’s First MediaTek G50 Processor, 6GB* RAM, 64GB Storage, 90Hz Smooth Display, Dual DTS Speakers, and so much more.
Sale starts on 26th Nov, 12 Noon.
Check it out 👉 https://t.co/kkBHSEqlN2#TECNOMobile pic.twitter.com/nfouAwtBNU
Tecno Pop 9 फक्त 3GB + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसह येतो, ज्याची किंमत 6,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत 200 डिस्काउंटसह सूचिबद्ध करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री 26 नोव्हेंबरपासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर सुरू होईल. टेक्नो पॉप ग्लिटरी व्हाइट, लाइम ग्रीन आणि स्टारट्रेल ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.
TECNO POP 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Tecno Pop 9 या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. यामध्ये DTS सराउंड साउंड सपोर्ट सुद्धा आहे. जलद काम करण्यासाठी MediaTek Helio G50 चिप उपलब्ध आहे. स्टोरेज आणि मल्टीटास्किंगसाठी, या मोबाईल फोनमध्ये 3GB रॅम, व्हर्च्युअल रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 14 Go ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो.
कंपनीने नवीन Tecno Pop 9 मोबाईल फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13MP कॅमेरा दिला आहे. या बजेट फोनला IP54 रेटिंग मिळते. हे सुनिश्चित करते की फोन पाणी आणि धुळीमुळे खराब होणार नाही. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे. फोन पूर्ण चार्ज केल्यावर 100 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक वेळ देईल, असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile