TECNO POP 9 Launch: ‘या’ प्रोसेसरसह भारतातील पहिला फोन, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी 

Updated on 18-Nov-2024
HIGHLIGHTS

TECNO POP 9 स्मार्टफोनची भारतातील लाँच तारीख जाहीर

हा नवीनतम स्मार्टफोन भारतात 22 नोव्हेंबरला लाँच केला जाईल.

हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाऊ शकतो.

TECNO POP 9 Launch: बजेट स्मार्टफोन देण्यासाठी सुप्रसिद्ध टेक ब्रँड TECNO लवकरच एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा स्मार्टफोन TECNO POP 9 या नावाने लाँच केला जाणार आहे. विशेष म्हणजे MediaTek G50 प्रोसेसरवर चालणारा हा भारतातील पहिला मोबाइल असेल. त्याबरोबरच, कंपनीने नवीन ‘Pop 9’ चे 4G मॉडेल भारतात लाँच करण्याची घोषणा देखील केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात TECNO POP 9 चे भारतीय लॉन्चिंग तपशील-

Also Read: Realme GT 7 Pro चे प्री-बुकिंग भारतात सुरू! ‘अशा’प्रकारे बुक करा लेटेस्ट फोन, पहा ऑफर्स

TECNO POP 9 ची भारतीय लाँच डेट

TECNO कंपनीने TECNO POP 9 स्मार्टफोनची भारतातील लाँच तारीख जाहीर केली आहे. हा नवीनतम स्मार्टफोन भारतात 22 नोव्हेंबरला लाँच केला जाईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon लिस्टिंगच्या माध्यमातून लाँचपूर्वी फोनचे अनेक फीचर्स समोर देखील आले आहेत. एवढेच नाही तर, फोनची किंमत रेंज देखील समोर आली आहे.

TECNO POP 9 चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Amazon प्रोडक्ट पेजनुसार, TECNO POP 9 फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. तर, डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेरासाठी फोनमध्ये पंच-होल कटआउट देखील मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Helio G50 प्रोसेसरने सुसज्ज असेल. कंपनीने हे देखील उघड केले आहे की फोनची किंमत रुपये x,x99 असेल. यावरून, हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाईल, असा अंदाज आहे.

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये सिंगल 13MP प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. तर, पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 5000mAh असेल. फोन एका चार्जवर 100 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देईल, असा कंपनीचा दावा आहे. तसेच, पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP54 रेटिंग मिळेल. यामध्ये तुम्हाला 6GB पर्यंत RAM सह व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळेल, तर फोनचे स्टोरेज 64GB पर्यंत मिळेल. फोन ग्लिटरी व्हाइट, लाइम ग्रीन आणि स्टारट्रेल ब्लॅक इ. कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :