Absolutely Lowest ! नवा बजेट स्मार्टफोन Tecno Pop 8 अतिशय कमी किमतीत भारतात लाँच, बघा किंमत। Tech News 

Absolutely Lowest ! नवा बजेट स्मार्टफोन Tecno Pop 8 अतिशय कमी किमतीत भारतात लाँच, बघा किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

आणखी एक स्वस्त स्मार्टफोन Tecno POP 8 भारतीय बाजारात लाँच

बँक ऑफर अंतर्गत कंपनी Tecno POP 8 वर 500 रुपयांची सूट देत आहे.

फोटोग्राफीसाठी Tecno POP 8 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने आज आणखी एक स्वस्त स्मार्टफोन Tecno POP 8 भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा पॉकेट फ्रेंडली स्मार्टफोन बँक ऑफरसह आणखी स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध असेल. या फोनमध्ये 8GB रॅम, 90Hz डिस्प्ले, 8MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी सारखी फीचर्स मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात फोनची किंमत आणि सर्व तपशील.

Tecno-Pop-8-features

Tecno Pop 8 ची किंमत

Tecno POP 8 ची किंमत 6,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. बँक ऑफर अंतर्गत, कंपनी त्यावर 500 रुपयांची सूट देत आहे, त्यानंतर फोनची प्रभावी किंमत 5,999 रुपये होईल. हा फोन मिस्ट्री व्हाईट, अल्पेन्ग्लो गोल्ड, मॅजिक स्किन आणि ग्रॅव्हिटी ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून हा मोबाईल फोन 9 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon वरून खरेदी करता येईल.

Tecno Pop 8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Techno Pop 8 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा फोन Unisoc T606 ARM Cortex-A53 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. फोन 4GB भौतिक आणि अतिरिक्त 4GB आभासी रॅमसह येतो. म्हणजेच फोनमध्ये एकूण तुम्हाला 8GB RAM ची पॉवर मिळणार आहे.

tecno pop 8 launched in india
Tecno Pop 8

फोटोग्राफीसाठी, Tecno POP 8 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यामध्ये F/1.8 अपर्चर आणि सेकंडरी AI लेन्ससह 13MP प्रायमरी सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन ड्युअल LED फ्लॅशसह सुसज्ज 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. हा फोन 5,000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो, ज्यासह 10W चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, टेक्नो पॉप 8 मध्ये 1TB SD कार्ड स्थापित केले जाऊ शकते. सुरक्षेसाठी फोनच्या साइड फ्रेमवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 100% रिसायकल करण्यायोग्य बॅक कव्हर वापरण्यात आले आहे. फोनमध्ये डबल डीटीएस स्पीकर देण्यात आले आहेत. या फोनसह FM रेडिओ आणि OTG सारखे पर्यायही उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo