8GB रॅमसह Tecno चा सर्वात वेगवान फोन भारतात 3 जानेवारीला होणार लाँच, मिळतील Attractive फीचर्स। Tech News 

8GB रॅमसह Tecno चा सर्वात वेगवान फोन भारतात 3 जानेवारीला होणार लाँच, मिळतील Attractive फीचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

भारतात Tecno Pop 8 स्मार्टफोन लवकरच लाँच होणार

कंपनी 3 जानेवारी 2024 रोजी देशात Tecno Pop 8 स्मार्टफोन लाँच करेल.

Tecno Pop 8 फोन अभिमानाने ‘Made in India’ आहे.

Tecno भारतात आपल्या स्मार्टफोन लाइनअपचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने पुढील महिन्यात भारतात Tecno Pop 8 स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. Tecno कंपनी बजेट रेंजमध्ये जबरदस्त स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे Tecno चा हा फोन बजेट रेंजमध्येच लाँच होणार असल्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा: Nothing Phone (2) वर मिळतोय तब्बल 10,000 रुपयांचा Discount, फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतायेत Best ऑफर्स

Tecno Pop 8 लॉन्चिंग डिटेल्स

Tecno ने पुष्टी केली आहे की, कंपनी 3 जानेवारी 2024 रोजी देशात Tecno Pop 8 स्मार्टफोन लाँच करेल. “3 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अंतिम टेक पार्टीसाठी सज्ज व्हा! TECNO POP 8 स्टायलिश आणि ऍक्सीसेबल होणार आहे. हा स्मार्टफोन भारी आहे, जो तरुण आणि उत्साही वापरकर्त्यांच्या गरज पूर्ण करेल! तसेच, हा फोन अभिमानाने ‘Made in India’ आहे. TECNO POP सिरीज एंट्री-लेव्हल वापरकर्त्यांसाठी उत्तम आहे. तसेच व्हायब्रन्ट आणि कूल लोकांसाठी योग्य आहे!” असे कंपनीने म्हटले आहे.

Tecno Pop 8 साठी Amazon मायक्रोसाईट

Tecno-Pop-8-features

Tecno Pop 8 फोनची मायक्रोसाइट देखील Amazon वर लाइव्ह झाली आहे. मायक्रोसाइटवरून समजून येते की, हा फोन परवडणाऱ्या किमतीत येईल. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात डायनॅमिक पोर्ट फीचर असेल. तसेच, यात 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेज असेल, हा स्मार्टफोन 4GB व्हर्चुअल रॅमसह देखील येईल. या हँडसेटमध्ये डॉट-इन डिस्प्ले असेल जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

Tecno Spark Go 2024

Tecno ने अलीकडेच या महिन्याच्या सुरुवातीला भारतात आपला Spark Go 2024 स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने सध्या बेस व्हेरिएंटची किंमत 6,699 रुपये असल्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन 3GB +64GB, 8GB+64GB आणि 8GB+128GB अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हे डिवाइस ऑक्टा-कोर Unisoc T606 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. तर, त्यात 5000mAh बॅटरी देखील आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo