digit zero1 awards

Absolutely Lowest! Tecno Pop 8 चे भारतीय लाँच कन्फर्म, 7000 रुपयांपेक्षा कमी असेल किंमत। Tech News 

Absolutely Lowest! Tecno Pop 8 चे भारतीय लाँच कन्फर्म, 7000 रुपयांपेक्षा कमी असेल किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

भारतात पॉप सिरीज अंतर्गत Tecno Pop 8 लवकरच होणार लाँच

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीझरद्वारे आगामी स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा

हा फोन 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.

बजेट स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असणारी कंपनी Tecno परत एकदा मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता भारतात 7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्वस्त स्मार्टफोन घेऊन येत आहे. जो भारतात पॉप सिरीज अंतर्गत Tecno Pop 8 नावाने दाखल होईल. ब्रँडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीझरद्वारे आगामी स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा: लेटेस्ट IQOO 12 5G स्मार्टफोन Discount सह स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा अप्रतिम ऑफर। Tech News

Tecno Pop 8 भारतीय लाँच

Tecno Pop 8 मोबाईल लाँच करण्याची घोषणा Tecno Mobile India हँडल वरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवर करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे कंपनीने स्मार्टफोनचा टीजर Video शेअर केला आहे. जरी टीझरमध्ये लाँच डेट नसली तरी काही दिवसांत फोन लाँच होण्याची घोषणा अधिकृतपणे करण्यात आली आहे. हा स्वस्त स्मार्टफोन उत्कृष्ट कामगिरी आणि वेग देईल, असे टीजर व्हीडिओद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

एवढेच नाही तर, या फोनची अपेक्षित किंमत देखील टीजरद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. हा फोन 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.

Tecno Pop 8 चे स्पेसिफिकेशन्स

tecno pop 8  launch to be soon in india
#image_title

हा स्मार्टफोन आधीच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे, ज्यामुळे त्याचे स्पेसिफिकेशन्स देखील ग्लोबल मार्केट सारखे असू शकतात. त्यानुसार, Tecno Pop 8 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD + LCD डिस्प्ले आहे, जो पंच-होल डिझाइन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. या एंट्री लेव्हल मोबाइलमध्ये Unisoc T606 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा फोन 3GB RAM, 4GB RAM + 64GB आणि 128GB स्टोरेजमध्ये येतो. तर, यात 3GB आणि 4GB एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजी देखील आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये F/1.8 अपर्चर आणि AI लेन्ससह 13MP चा प्रायमरी सेन्सर उपलब्ध आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo