सध्या बऱ्याच टेक कंपन्या परवडणारे स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. या यादीत आता आणखी एक नाव सामील झाले आहे. Tecno ने आपल्या स्मार्टफोन्सच्या श्रेणीचा विस्तार करत एक नवीन हँडसेट Tecno Pop 6 Pro भारतात लाँच केला आहे. हा Tecno फोन 2 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो, त्याची किंमत 6,099 रुपये आहे. तुम्ही ते Amazon India वरून खरेदी करू शकता. Pop 6 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : Nokia T10: नोकियाने लाँच केला परवडणारा टॅबलेट, स्टिरीओ स्पीकरसह मिळेल HD डिस्प्ले
फोनमध्ये तुम्हाला 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंच लांबीचा HD+ पॅनेल दिसेल. वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. फोन 2GB LPDDR4x रॅम आणि 32GB eMMC5.1 स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Helio A22 चिपसेट देत आहे.
फेस अनलॉक फीचरसह येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल. फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो की नाही याबद्दल टेक्नोने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, एकदा फोन पूर्ण चार्ज झाला की तो 42 दिवस टिकेल, असा दावा निश्चितपणे केला जात आहे. फोन Android 12 Go Edition वर आधारित HiOS 8.6 वर काम करतो.
फोनमध्ये मागील बाजूस फोटोग्राफीसाठी LED फ्लॅशसह दोन कॅमेरे मिळतील. यामध्ये 8-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह AI लेन्सचा समावेश आहे. तर, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.