अलीकडेच सौदी अरेबियामध्ये लॉन्च झालेला स्मार्टफोन Tecno Phantom X2 Pro आता लवकरच भारतात लाँच होणार आहे. भारतात हा डिवाइस लॉन्च होण्याआधी कंपनीने त्याच्या फीचर्स संबंधित माहिती उघड केली आहे. Tecno Phantom X2 Pro 50MP कॅमेरा, रिट्रेक्टेबल पोर्ट्रेट कॅमेरा आणि मोठ्या 1.2-मायक्रॉन कॅमेरासह येईल. स्मार्टफोनची प्री-ऑर्डर करणार्या ग्राहकांना लॉन्च ऑफर अंतर्गत अतिरिक्त फायदे मिळवण्याची संधी देखील मिळेल.
हे सुद्धा वाचा : Instagram वरही मिळतोय WhatsApp सारखा सिक्युरिटी फीचर, तुमचे चॅट्स राहतील सुरक्षित…
Tecno Phantom X2 Pro Amazon वरून प्री-ऑर्डर करता येईल. लॉन्च ऑफर अंतर्गत, तुम्हाला तुमच्या जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याव्यतिरिक्त, Amazon तुम्हाला या स्मार्टफोनवर पूर्ण एक वर्षाची Amazon प्राइम मेंबरशिप, तसेच 6 महिने नो कॉस्ट EMI देखील देत आहे. जर, तुम्ही Tecno Phantom X2 Pro ची ऑफलाइन किरकोळ दुकानांमधून प्री-ऑर्डर केल्यास, तुम्हाला एक प्रीमियम बिजनेस गिफ्ट बॉक्स दिला जाईल.
विशेष म्हणजे, 50 लकी ग्राहकांना Tecno Phantom X3 मध्ये मोफत अपग्रेड आणि संपूर्ण रु. 2,000 सूट मिळेल. स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डरसाठी नोंदणी 17 जानेवारीपासून सुरू होईल. लक्षात घ्या की, Tecno Phantom X2 5G काही काळापूर्वी भारतात लॉन्च झाला होता आणि कंपनीने आता Tecno Phantom X2 Pro ला टीज करायला सुरुवात केली आहे. डिव्हाइसच्या प्रो आणि व्हॅनिला मॉडेल्सची उर्वरित सर्व फीचर्स सारखीच असली, तरी त्यांच्या कॅमेऱ्याचे फीचर्स एकमेकांपेक्षा वेगळे आहेत.
Tecno Phantom X2 Pro 5G 120Hz रिफ्रेश रेट, 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.8-इंच फुल HD+ वक्र लवचिक AMOLED डिस्प्लेसह येईल. स्मार्टफोनची स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टससह संरक्षित आहे. डिव्हाइस MediaTek Dimensity 9000 5G द्वारे समर्थित आहे, जे 4nm प्रक्रियेवर डिझाइन केलेले आहे. Tecno Phantom X2 Pro 5G 256GB UFS 3.1 अंतर्गत स्टोरेज आणि 12GB LPDDR5 रॅम ऑफर करतो. फोनच्या सिक्युरिटी सिस्टममध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम आहे.
त्याबरोबरच, हँडसेटमध्ये 5,160mAh बॅटरी बॅकअप आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. स्मार्टफोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 6, ड्युअल-बँड Wi-Fi , ब्लूटूथ 5.3, GPS आणि चार्जिंगसाठी USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे.
Tecno Phantom X2 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्स, 50-मेगापिक्सेल सेकंडरी लेन्ससह रिट्रेक्टेबल पोर्ट्रेट लेन्स आणि 13-मेगापिक्सेल कॅमेरा समाविष्ट आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.