Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या Tecno Phantom X2 5G चे हे पावरफुल व्हर्जन आहे. चला तर जाणून घेऊयात, Tecno Phantom X2 Pro 5G मोबाईलची भारतातील किंमत, विक्रीची तारीख आणि या डिव्हाइसमध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल तपशीलवार माहिती…
हे सुद्धा वाचा : Nokia T21 टॅबलेट भारतात लॉन्च, मोठ्या स्क्रीनसह मिळेल 8,200mAh जम्बो बॅटरी
या टेक्नो मोबाईल फोनची किंमत 49 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे, आजपासून ग्राहकांसाठी Amazon वर या डिवाइसची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. या फोनसोबत 12 महिन्यांसाठी मोफत Amazon प्राइम मेंबरशिप दिली जात आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी, व्याजाशिवाय EMI ची सुविधा देखील उपलब्ध आहे.
या नवीनतम फोनमध्ये 6.8-इंच लांबीचा फुल-HD प्लस AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. सिक्योरिटीसाठी कंपनीने गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा वापर केला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, कंपनीने Techno Phantom X2 Pro मध्ये 4nm वर आधारित MediaTek Dimensity 900 चिपसेट वापरला आहे. तसेच, यात 5160 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जला सपोर्ट करते.
या व्यतिरिक्त, या डिवाइसमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेंसर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील भागात 32-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल. मागील कॅमेरा 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.