Tecno चा पहिला फोल्डेबल फोन लाँच, ‘हे’ फिचर्स फोनला बनवतात अप्रतिम
Tecno Phantom V fold भारतात लाँच
आज म्हणजेच 12 एप्रिलपासून अर्ली बर्ड सेल सुरू होणार
यादरम्यान, Amazon वर हा फोन स्वस्तात मिळेल.
Tecno ने भारतात आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Phantom V fold लाँच केला आहे. या स्मार्टफोनने या वर्षी MWC 2023 दरम्यान डेब्यू केले होते. कंपनीने हे देखील सांगितले की, फोल्डेबल फोन भारत सरकारच्या मेक इन इंडिया इनिशीएटीव्ह अंतर्गत बनवला जाईल.
Tecno Phantom V fold
Tecno Phantom V fold ला बूकसारखे डिझाईन देण्यात आले आहे. स्मार्टफोन ऐरोस्पेस मटेरियलने बनवला गेला आहे. यामध्ये 6.42 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल. जो ड्युअल 10Hz ते 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्यासोबतच, हा फोन 7.65 इंच 2K AMOLED डिस्प्ले ऑफर करतो.
हा फोन Mediatek Dimensity 9000+ 5G चिपसेटने सुसज्ज आहे. Tecno Phantom V fold अँड्रॉइड 13 वर आधारित कस्टम HiOS वर काम करतो. OS फोल्डेबल डीझाईनसाठी कस्टमाइज केला गेला आहे.
याशिवाय, कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास ट्रीपल कॅमेरा सेटअप मिळतोय. यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल आणि 50MP चा पोट्रेट लेन्स मिळतो. याशिवाय, सेल्फीसाठी आऊटर डिस्प्लेवर 32MP चा कॅमेरा आणि दुसरा 16MP चा कॅमेरा मेन डिस्प्लेवर देण्यात आला आहे.
भारतीय किंमत
Tecno Phantom V fold ची किंमत 89,999 रूपये इतकी आहे. तसेच, हाय एंड प्रकार 99,999 रुपयांना सादर केला गेला आहे. फोन आजपासून अर्ली बर्ड सेलमध्ये येणार आहे. दरम्यान, Amazon वर हा फोन 77,777 रुपयांना खरेदी करता येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile