प्रतीक्षा संपली ! Tecno Phantom V Fold स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

प्रतीक्षा संपली ! Tecno Phantom V Fold स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

कंपनीने MWC 2023 मध्ये Tecno Phantom V Fold लाँच केला.

यामध्ये 12GB पर्यंत RAM सह अनेक उत्तम फीचर्स आहेत.

या तिमाहीत हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

Tecno Phantom V Fold मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2023 इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यात पावरफुल मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50MP कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोल्डेबल फोन 5G सपोर्टसह येतो. 

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy A54 Vs Samsung Galaxy A34: टॉप 5 लीक फीचर्समध्ये तुलना…

Tecno Phantom V Fold किंमत आणि भारतात उपलब्धता

Tecno Phantom V Fold स्मार्टफोन सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन म्हणून सादर करण्यात आला आहे. भारतात फोनची सुरुवातीची किंमत 89,999 रुपये असेल. ही डिवाइसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आहे. त्याच वेळी, 12GB रॅम + 512GB स्टोरेज असलेला फोन 99,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.

ऑफर अंतर्गत, बेस मॉडेल 79,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. या तिमाहीत हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट या दोनच रंगांच्या पर्यायांमध्ये येईल.

स्पेसिफिकेशन्स : 

 या फोल्डेबल फोनमध्ये 6.42-इंच लांबीचा AMOLED LPTO डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 1080 x 2520 आहे आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये 7.85-इंच लांबीचा AMOLED LTPO डिस्प्ले आहे ज्यामध्ये आतील बाजूस पंच होल आहे. त्याचे रिझोल्यूशन 2000 x 2296 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश दर 120Hz आहे.

Tecno Phantom V Fold मध्ये Dimensity 9000 Plus प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन 45W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. यात 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे. हे Android 13 वर चालते. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. 

फोटोग्राफीसाठी फोनच्या कव्हर डिस्प्लेवर 32MP कॅमेरा आणि अंतर्गत स्क्रीनवर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. गोल आकाराच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP टेलिफोटो लेन्स, 13MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि ड्युअल LED फ्लॅश आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo