Tecno Phantom V Fold 2 स्मार्टफोनचे भारतीय लाँच कन्फर्म! जाणून घ्या सर्व अपेक्षित तपशील

Updated on 18-Oct-2024
HIGHLIGHTS

Tecno Phantom V Flip2 आणि Tecno Phantom V Fold 2 अलीकडेच जागतिक बाजारात लाँच केले.

ब्रँडने आगामी फोल्डेबल स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली.

कंपनीने Tecno Phantom V Fold 2 भारतात आणण्याचे हिंट दिले आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ब्रँडने आपले दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स गेल्या महिन्यातच जागतिक बाजारात लाँच केले आहेत. दोन नवे स्मार्टफोन्स Tecno Phantom V Flip2 आणि Tecno Phantom V Fold 2 या नावांनी सादर केले. यापैकी एक फोल्डेबल फोन V Fold 2, आता भारतात येण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर, ब्रँडने आगामी फोल्डेबल स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता नवीन Techno Phantom V Fold 2 बद्दल माहिती जाणून घेऊयात.

Also Read: 64MP कॅमेरासह Google Pixel 7a वर मिळतोय भरपूर Discount, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

Tecno Phantom V Fold 2 चे इंडिया लॉन्चिंग डिटेल्स

Tecno ने ब्रँडच्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाउंटवर आपल्या आगामी स्मार्टफोनबद्दल माहिती दिली आहे. होय, कंपनीने Tecno Phantom V Fold 2 भारतात आणण्याचे हिंट दिले आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की, “गेल्या वर्षी लॉन्च झालेला Phantom V Fold सोल्ड आऊट झाला आहे”, असे लिहले आहे.

त्याबरोबरच, ब्रँडच्या अधिकृत टीझरमध्ये ‘A new chapter will unfold soon’ असे लिहिले आहे. यावरून Tecno Phantom V Fold 2 लवकरच भारतात येईल, असा अंदाज बांधला जात आहे. येत्या काही दिवसांत ब्रँडकडून अधिकृत लाँच डेट जारी केली जाईल.

Tecno Phantom V Fold 2 चे अपेक्षित तपशील

वर सांगितल्याप्रमाणे, Tecno Phantom V Fold 2 फोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. हा फोन भारतात देखील समान स्पेक्स आणि डिझाइनसह सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.85-इंच लांबीचा LTPO AMOLED प्राथमिक डिस्प्ले आणि कव्हर स्क्रीन 6.45 इंच लांबीची आहे. हे देखील एक LTPO AMOLED पॅनेल आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ चिपसेट देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी डिव्हाइसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये OIS सह 50MP प्राइमरी, 2x ऑप्टिकल झूमसह 50MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी यात दोन 32MP कॅमेरे मिळतील. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये मोठी 5,750mAh बॅटरी आहे. ते चार्ज करण्यासाठी 70W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. एवढेच नाही तर 15W वायरलेस चार्जिंग देखील आहे. या फोल्ड फोनमध्ये अनेक प्रकारचे AI कॅमेरे आणि इतर फीचर्स आहेत. मात्र, लाँचनंतरची फोनचे भारतीय फीचर्स पुढे येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :