Tecno Phantom V Flip स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचची तारीख अद्याप आली नसली, तरी हा मोबाईल ई-कॉमर्स साइट Amazon वर येईल, याची पुष्टी करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 22 सप्टेंबर रोजी ग्लोबली लाँच होणार आहे. दरम्यान, एका प्रसिद्ध टिपस्टरने सोशल मीडियावर फोनच्या किमतीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. चला तर मग बघुयात Tecno Phantom V Flip फोनची लीक किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
टिपस्टर पारस गुगलानीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Tecno Phantom V Flip ची किंमत शेअर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Techno Phantom V Flip भारतात 50 ते 55 रुपयांच्या श्रेणीमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या किंमत श्रेणीसह या फोनची स्पर्धा अलीकडेच लाँच झालेल्या Motorola Razr 40 शी होऊ शकते.
आतापर्यंत मिळालेल्या लीकनुसार, टेक्नोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच लांबीचा फोल्डेबल AMOLED डिस्प्ले असेल. यासह, 1.32 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले 466×466 पिक्सेल रिझोल्यूशनसह मिळू शकतो. या डिवाइसमध्ये Dimensity 8050 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
फॅंटम व्ही फ्लिप वापरकर्त्यांना ऑटो फोकस तंत्रज्ञानासह 64-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा लेन्स देऊ शकते. सोबत 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स उपलब्ध होऊ शकते. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. यात 4000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याचेही सांगितले जात आहे.
लक्षात घ्या की, वरील सर्व स्पेसिफिकेशन्स आतापर्यंत मिळालेल्या लीकनुसार आहेत. मात्र, हा फोन लाँच झाल्यावरच फोनच्या सर्व कन्फर्म तपशीलांची माहिती मिळणार आहे.