digit zero1 awards

Tecno Phantom V Flip फोनची सेल आजपासून होणार सुरू, Special Offers सह खरेदी का Latest स्मार्टफोन| Tech News 

Tecno Phantom V Flip फोनची सेल आजपासून होणार सुरू, Special Offers सह खरेदी का Latest स्मार्टफोन| Tech News 
HIGHLIGHTS

Tecno Phantom V Flip फोनची अर्ली बर्ड सेल आज 1 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार

हा फोन MediaTek Dimensity 8050 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा मिळेल.

Tecno Phantom V Flip भारतात सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची सेल अखेर आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. बाजारातील उपलब्ध इतर फ्लिप स्मार्टफोन्सपेक्षा हा स्मार्टफोन कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे. फोनची अर्ली बर्ड सेल आज 1 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे, जो तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. बघुयात फोनवर उपलब्ध अर्ली बर्ड सेलमधील ऑफर्स.

Tecno Phantom V Flip ची किंमत आणि ऑफर्स

कंपनीने भारतात Tecno Phantom V Flip स्मार्टफोन 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे, ज्याची किंमत 49,999 रुपये आहे. या सेलमध्ये ग्राहक 4,167 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह फोन घरी आणू शकतात. आयकॉनिक ब्लॅक आणि मिस्टिक डॉन दोन कलर ऑप्शन्समध्ये हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Tecno Phantom V Flip

Tecnoच्या या फ्लिप फोनमध्ये 6.9-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, फोनमध्ये 1.32 इंच कव्हर डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 466 x 466 पिक्सेल आहे. त्यासोबतच हा फोन MediaTek Dimensity 8050 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह जोडलेला आहे. डायमेन्सिटी 8050 हा एक अत्याधुनिक प्रोसेसर आहे जो प्रभावी वैशिष्ट्ये आणि कार्यप्रदर्शन क्षमतेसह येतो, ज्यामुळे तो विविध मोबाइल उपकरणांसाठी आकर्षक पर्याय बनतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आहे, त्यासह 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4000mAh बॅटरी आहे, ज्यासह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की या फोनमध्ये 10 मिनिटांत 33 टक्के चार्ज करण्याची क्षमता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo