बहुप्रतिक्षित Tecno Phantom V Flip 5G अखेर Launch, तुमच्यासाठी आहे का Affordable? Tech News 

बहुप्रतिक्षित Tecno Phantom V Flip 5G अखेर Launch, तुमच्यासाठी आहे का Affordable? Tech News 
HIGHLIGHTS

Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन जागतिक स्तरावर लॉन्च

भारतात लवकरच सुरु होणार या फोनची अर्ली बर्ड सेल

1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून या उपकरणाची विक्री सुरू होईल.

Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन जागतिक स्तरावर लॉन्च झाला आहे. हे Tecno चे पहिले उपकरण आहे, जे क्लॅमशेल डिझाइनसह येते. बऱ्याच दिवसांपासून या स्मार्टफोनची टेक विश्वात चर्चा सुरु होती. हे जागतिक बाजारपेठेत Galaxy Z5 Flip, Moto Razr 40 आणि Oppo Find N2 Flip सारख्या फ्लिप मोबाईल फोनशी स्पर्धा करेल. यापूर्वी, कंपनीने फोल्डेबल फोन Tecno V Fold चे अनावरण केले होते.

Tecno Phantom V Flip 5G ची किंमत

टेक्नोच्या या फ्लिप फोनची किंमत 700 युरो म्हणजेच सुमारे 61,751 रुपये आहे. हे उपकरण ब्लॅक आणि पर्पल रंगात सादर करण्यात आले आहे. सध्या कंपनीने इतर देशांमध्ये V Flip लाँच आणि किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Tecno Phantom V Flip 5G

भारतात सुरु होणार Early Bird Sale 

टेक्नोने या फ्लिप फोनच्या भारतातील लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु लवकर अर्ली बर्ड सेल सुरु होणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून या उपकरणाची विक्री सुरू होईल.

Tecno Phantom V Flip 5G

टेक्नोने Phantom V Flip 5G स्मार्टफोनला 6.9 इंचाचा आतील डिस्प्ले दिला आहे, तर बाहेरील फोनमध्ये 1.32 इंच AMOLED स्क्रीन आहे. त्यांचे रिझोल्यूशन 1,080×2,640 पिक्सेल आहे आणि रीफ्रेश दर 120Hz आहे. पॉवरसाठी, हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 8050 octa-core प्रोसेसर, 256GB स्टोरेज आणि 8GB रॅम आहे. त्याच वेळी, हा फोन Android 13 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, हँडसेटमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे स्पेक्स आहेत.

फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला 64MP मुख्य लेन्स आणि दुसरा 13MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन 4,000mAh बॅटरीसह येतो जो 45W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo