Tecno ने आपल्या स्मार्टफोन्सची रेंज वाढवत एक नवीन हँडसेट Tecno Spark 9 लाँच केला आहे. कंपनीचा Spark 9 सीरीजचा हा पहिला स्मार्टफोन आहे. फोन 6 GB पर्यंत RAM सह येतो. यामध्ये कंपनी 5 GB व्हर्च्युअल रॅम फीचर देखील देत आहे. यासह, फोनची एकूण रॅम 11 GB होईल. Tecno Spark 9 (6GB+128GB) ची किंमत 9,499 रुपये आहे. या किंमतीत 11GB रॅम ऑफर करणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे.
हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांसाठी Infinix ने आणला एक जबरदस्त लॅपटॉप, तब्बल 11 तास चालेल बॅटरी, किंमतही कमी
हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्येही लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत 8,499 रुपये आहे. 4 GB रॅम वेरिएंटमध्ये कंपनी 3 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देत आहे. Tecno Spark 9 ची पहिली सेल 23 जुलैपासून Amazon India वर सुरू होईल. Tecno Spark 9T आणि Spark 8 Pro देखील लवकरच या सिरीजमध्ये प्रवेश करू शकतात. चला तर जाणून घेऊयात, Tecno Spark 9 बाबत सविस्तर माहिती…
फोनमध्ये कंपनी 6.6-इंच लांबीचा HD + टीयरड्रॉप नॉच LCD पॅनेल देत आहे. फोनमध्ये आढळणारा हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने हा फोन 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये लाँच केला आहे. या फोनचे सर्वात मोठे फिचर म्हणजे हा 5 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. या बजेट फोनमध्ये तुम्हाला 11 GB रॅमच्या परफॉर्मन्सचा आनंद घेता येईल.
https://twitter.com/TecnoMobileInd/status/1548917986681098242?ref_src=twsrc%5Etfw
प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Helio G37 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दरम्यान, सेल्फीसाठी, तुम्हाला यात 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.
टेक्नोच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेला हा फोन Android 12 वर आधारित HiOS UI वर काम करतो. कंपनीने हा फोन इन्फिनिटी ब्लॅक आणि स्काय मिरर कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. मजबूत आवाजासाठी फोनमध्ये DTS पॉवर्ड स्पीकर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला 3.5mm हेडफोन जॅकसह सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन मिळतील.