digit zero1 awards

Tecno MegaBook T1: 16GB रॅमसह नवा लॅपटॉप भारतात लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 37,999 रुपये

Tecno MegaBook T1: 16GB रॅमसह नवा लॅपटॉप भारतात लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 37,999 रुपये
HIGHLIGHTS

Tecno चा Tecno MegaBook T1 लॅपटॉप भारतीय बाजारात लाँच

या लॅपटॉपची अर्ली बर्ड सेल आजपासून सुरु झाली आहे.

सेलदरम्यान लॅपटॉपवर 2 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने Tecno MegaBook T1 लॅपटॉप भारतीय बाजारात लाँच केला आहे. आपण या लॅपटॉपच्या लुक आणि डिझाइनबद्दल बोललो तर ते खूपच आकर्षक आहे. लॅपटॉपची बॉडी ऍल्युमिनियम मटेरियलने बनवली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे. चला तर मग Tecno MegaBook T1 ची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात. 

Tecno MegaBook T1 ची किंमत 

tecno megabook t1

Tecno MegaBook T1 च्या Intel Core i3 व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 512GB SSD मिळेल. तर, त्याच्या टॉप व्हेरिएंट म्हणजेच i7 व्हेरिएंट 16GB रॅम आणि 1TB SSDसह येईल, ज्याची किंमत 57,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबरच, Core i5 प्रोसेसर, 16GB RAM आणि 512GB SSD व्हेरिएंट 47,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 

हा लॅपटॉप तुम्हाला डेनिम ब्लू, स्पेस ग्रे आणि मूनशाईन सिल्व्हर कलरमध्ये खरेदी करता येईल. या लॅपटॉपची अर्ली बर्ड सेल आजपासून सुरु झाली आहे. हा लॅपटॉप Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा लॅपटॉप 19 सप्टेंबर रोजी पहिल्या सेलमध्ये आणला जाणार आहे. 

Tecno MegaBook T1 अर्ली बर्ड सेल 

Intel Core i7 अर्ली बर्ड सेलमध्ये 57,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच, Intel Core i5 अर्ली बर्ड सेलमध्ये 47,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर, Intel Core i3 व्हेरिएंट अर्ली बर्ड सेलमध्ये केवळ 37,999 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच सेलदरम्यान लॅपटॉपवर 2 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. 

Tecno MegaBook T1 मुख्य तपशील 

Tecno MegaBook T1 लॅपटॉपमध्ये 15.6-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. वर सांगितल्याप्रमाणे, Tecno MegaBook T1 मध्ये Core i7 पर्यंत प्रोसेसर आहे. हे 11 जनरेशन मॉडेलसह येईल. तसेच, यात 16GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. यासोबतच, डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी टीयूव्ही राईनलँड आय कम्फर्ट प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo