बऱ्याच टेक कंपन्या आता सामान्य ग्राहकांना परवडणारे स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. कमी पैशांमध्ये उत्तम फीचर्स असलेले दर्जेदार फोन्स कंपन्यांकडून बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या यादीमध्ये आणखी एक स्मार्टफोन समाविष्ट झाले आहे. Tecno ने आपला नवीन आणि बजेट स्मार्टफोन Tecno Pova 3 फिलिपिन्स मध्ये लाँच केला आहे. Tecno Pova 3 मध्ये 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.9-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसरसह 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळेल. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात या नवीन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत…
Tecno Pova 3मध्ये Android 11 सह HiOS मिळेल. फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.9-इंच लांबीचा फुल HD + LCD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसरसह 6 GB RAM आणि 5 GB व्हर्च्युअल रॅम म्हणजेच एकूण 11 GB रॅम मिळेल. Tecno Pova 3 मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. मात्र, इतर दोन लेन्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याबरोबरच, 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Tecno Pova 3मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, NFC, GPS आणि USB Type-C पोर्टसह फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल. यात 7000mAh ची बॅटरी आहे, ज्यासोबत 25Wचा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनसोबत 10W रिव्हर्स चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे. बॉक्समध्ये 33W चा चार्जर उपलब्ध असेल.
Tecno Pova 3 ची किंमत 8,999 फिलीपीन पेसो म्हणजेच सुमारे 13,300 रुपये आहे. ही किंमत 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज वेरिएंटची आहे. त्याबरोबरच, 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 9,399 फिलिपीन्स पेसो म्हणजेच सुमारे 13,900 रुपये. हा फोन 31 मे पासून इको ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लू आणि टेक सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. मात्र, भारतात या फोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.