Tecno Camon 30 Series 5G ची भारतात Sale सुरु, पहिल्या विक्रीदरम्यान मिळेल थेट 3000 रुपयांचा Discount। Tech News

Updated on 23-May-2024
HIGHLIGHTS

Tecno Camon 30 Series 5G स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु होणार

आज दुपारी 12 वाजता लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सुरू झाली आहे.

लाँच ऑफर अंतर्गत फोनवर 3000 रुपयांची त्वरित सूट उपलब्ध

बहुप्रतीक्षित Tecno Camon 30 Series 5G अलीकडेच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आज या स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या या सीरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन समाविष्ट आहेत. पहिल्या सेलमध्ये, बंपर डिस्काउंटसह Tecno Camon 30 Series 5G सिरीजमधील स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी असेल. जाणून घाई स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स-

Tecno Camon 30 Series 5G ची पहिली सेल

Tecno Camon 30 Series 5G ची पहिली विक्री आज दुपारी 12 वाजता लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सुरू झाली आहे. 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेला फोनचा बेस व्हेरिएंट 22,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याबरोबरच, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह फोनचा टॉप व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. या सिरीजचा प्रीमियर व्हेरिएंट 12GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेज मॉडेल 39,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

#Tecno Camon 30

या सेलमध्ये लाँच ऑफर अंतर्गत फोनवर 3000 रुपयांची त्वरित सूट उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर फक्त ICICI बँकेच्या कार्डद्वारे डिस्काउंटवर दिली जाणार आहे. म्हणजेच ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला ICICI बँकेच्या कार्डद्वारे संपूर्ण पेमेंट व्यवहार करावा लागेल. येथून खरेदी करा

Tecno Camon 30 Series 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 30 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा LTPS AMOLED FHD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 7020 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 100MP अल्ट्रा मोड आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर, स्मार्टफोनच्या पुढील बाजूस 50MP AF सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. यात 5000mah बॅटरी आहे, जी 70W फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह येईल.

तर, दुसरीकडे प्रीमियर मॉडेलमध्ये 6.77-इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये डायमेन्सिटी 8200 चिपसेट उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. हा फोन 50MP सेल्फी कॅमेरासह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :