Tecno Camon 30 सिरीज भारतात Powerful फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स। Tech News

Updated on 20-May-2024
HIGHLIGHTS

Tecno Camon 30 सिरीज भारतीय बाजारपेठेत लाँच झाली आहे.

विशेष म्हणजे या स्मार्टफोन्समध्ये 12GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे.

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर देखील मिळेल.

बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर Tecno Camon 30 सिरीज भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आली आहे. या सिरीजअंतर्गत Tecno Camon 30 आणि CAMON 30 Premier 5G असे दोन फोन लाँच केले गेले आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टफोन्समध्ये 12GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर देखील मिळेल. त्याबरोबरच, हे फोन शक्तिशाली बॅटरीसह येतात. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: Powerful फीचर्ससह भारतात लाँच होणार Vivo चा आगामी फोल्डेबल फोन! बघा अपेक्षित किंमत। Tech News

Tecno Camon 30 सिरीजची किंमत

Tecno Camon 30 स्मार्टफोनचा 8GB+256GB बेस व्हेरिएंट 22,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर, 12GB+256GB टॉप व्हेरिएंट 26,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. मात्र लॉन्च ऑफर अंतर्गत या दोन्ही व्हेरिएंटवर 3000 रुपयांची झटपट बँक सूट मिळणार आहे. यासह तुम्ही हा फोन 19,999 रुपयांना सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.

#Tecno Camon 30

दुसरीकडे, फोनच्या प्रीमियर 12GB+512GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. या फोनवर देखील लाँच ऑफर्स उपलब्ध आहेत. या अंतर्गत, तुम्ही 3000 रुपयांच्या सवलतीसह हा फोन केवळ 36,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त, कंपनी 4,999 रुपयांचे इतर बेनिफिट्स देखील देत आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही सिरीज 23 मे 2024 पासून लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon द्वारे सुरू होईल.

Tecno Camon 30 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 30 5G

Tecno Camon 30 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा LTPS AMOLED FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Dimensity 7020 5G प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 100MP अल्ट्रा मोड आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोनमध्ये 50MP AF सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. पॉवरसाठी, यात 5000mah बॅटरी आहे, जी 70W फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह केवळ 19 मिनिटांत फोन 50% चार्ज करेल.

Tecno Camon 30 Premier 5G

Tecno Camon 30 Premier 5G फोन 6.77 इंच लांबीच्या डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन LTPO AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate octacore प्रोसेसर देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, हा फोन 3 वर्षांच्या Android OS आणि 3 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्ससह देखील येतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. या फोनच्या मागील पॅनलवर असलेले तीनही कॅमेरा सेन्सर 50MP चे आहेत. येथे वापरकर्त्यांना क्वाड फ्लॅशसह सुसज्ज 50MP Sony IMX890 OIS मुख्य सेन्सर, 50MP 3x 70mm पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स मिळतात. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 50MP ऑटोफोकस कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये देखील 5,000mAh बॅटरी आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी स्मार्टफोन 70W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :