कमी किमतीत मिळेल जबरदस्त कॅमेरा! Tecno ची आगामी Camon 30 सिरीज ‘या’ दिवशी होणार भारतात लाँच। Tech News 

कमी किमतीत मिळेल जबरदस्त कॅमेरा! Tecno ची आगामी Camon 30 सिरीज ‘या’ दिवशी होणार भारतात लाँच। Tech News 
HIGHLIGHTS

Tecno Camon 30 सिरीज भारतात येत्या 18 मे रोजी लाँच होणार

या सिरीजअंतर्गत Tecno Camon 30 5G आणि Tecno Camon 30 प्रीमियर हे फोन सादर केले जातील.

Amazon वर दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील उघड झाले आहेत.

Tecno ने गेल्या आठवड्यातच घोषणा केली होती की, ते भारतात त्यांची नवीन Camon 30 सिरीज सादर करणार आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगतो की, Tecno Camon 30 सिरीज भारतात येत्या 18 मे रोजी लाँच होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या सिरीजअंतर्गत Tecno Camon 30 5G आणि Tecno Camon 30 प्रीमियर फोन लाँच केले जातील. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात आगामी Tecno Camon 30 सिरीजचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

हे सुद्धा वाचा: लाँचपूर्वीच Samsung Galaxy F55 5G चे सर्व स्पेसिफिकेशन्स उघड, 50MP सेल्फी कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स। Tech News

Tecno Camon 30 सिरीजचे भारतीय लाँच

वर सांगितल्याप्रमाणे, सिरीजचे दोन्ही फोन Tecno Camon 30 5G फोन आणि Camon 30 प्रीमियर 18 मे रोजी भारतात लाँच केले जातील. Tecno Camon 30 सीरीजचे प्रोडक्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर लाइव्ह केले गेले आहे. Amazon वर दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील उघड झाले आहेत. यासह सीरिजच्या दोन्ही फोनमध्ये कमी किमतीत भारी कॅमेरा मिळेल, असे सांगण्यात आले आहे.

Tecno Camon 30 सिरीजचा कॅमेरा

आगामी सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन 50MP फ्रंट कॅमेरासह लाँच केले जातील, असे Tecno ने म्हटले आहे. याला ’50MP AF’ सेल्फी कॅमेरा असे नाव देण्यात आले आहे. जेथे AF चा अर्थ ऑटो फोकस असा आहे. दोन्ही फोनच्या मागील पॅनलवर OIS सह सुसज्ज कॅमेरा लेन्स दिला जाईल.

याव्यतिरिक्त, Camon 30 5G मध्ये 1.0μm पिक्सेल आकाराचा सेन्सर 100MP मोडवर काम करण्यास सक्षम असेल, जो नाईट फोटोग्राफी उत्कृष्ट करेल. तर Camon 30 प्रीमियरला OIS फीचर्सने सुसज्ज असलेला 50MP Sony IMX890 रियर कॅमेरा ऑफर केला जाईल.

Tecno camon 30 premier 5g launched with 50mp selfie camera and much more
Tecno camon 30 premier 5g launched with 50mp selfie camera and much more

Tecno Camon 30 5G चे ग्लोबल स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 30 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. ग्लोबलमध्ये हा फोन AMOLED पॅनलवर सादर करण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7020 ऑक्टा-कोर दिले आहे. फोटोग्राफीसाठी फोन 50MP फ्रंट कॅमेराला देखील सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये OIS तंत्रज्ञानासह 50MP चा मुख्य सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 70W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000mAh ची बॅटरी देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo