Price Cut: Tecno च्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या किमतीत मोठी घट, लिमिटेड टाइम ऑफर

Updated on 28-Jun-2023
HIGHLIGHTS

Tecno Camon 20 Pro 5G स्मार्टफोनच्या किमतीत घट

या फोनच्या किमतीत एकूण 2000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या ऑफरचा लाभ 30 जूनपर्यंत घेता येणार आहे.

अलीकडेच लाँच झालेल्या Tecno Camon 20 Pro 5G स्मार्टफोनची किंमत भारतात कमी झाली आहे. आता ग्राहक हे उपकरण स्वस्तात खरेदी करू शकतात. या फोनच्या किमतीत एकूण 2000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, ही घट केवळ काही काळासाठी मर्यादित आहे. हा फोन भारतीय बाजारात गेल्या महिन्यात Camon 20 सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आला. 

Tecno Camon 20 Pro 5G ची नवी किंमत

Tecno ने या डील अंतर्गत या स्मार्टफोनवर 2,000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. ज्यामुळे फोनचा 8GB + 128GB बेस मॉडेल 19,999 रुपयांवरून 17,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 21,999 रुपये आहे. हा फोन 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. महत्त्वाचे म्हणजे या ऑफरचा लाभ 30 जूनपर्यंत घेता येणार आहे.

Tecno Camon 20 Pro 5G चे तपशील

 Tecno Camon 20 Pro 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर आणि 256GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, याद्वारे तुमचा फोन सुरळीत चालण्यास मदत होईल. फोन Android 13 वर कार्य करेल. 

फोटोग्राफीसाठी मोबाईलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये 64MP मुख्य लेन्स, दुसरी 2MP मॅक्रो आणि तिसरी 2MP डेप्थ लेन्स आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे, यात 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :