नव्या आणि आकर्षक रंगरूपात लाँच झाला Tecno चा लेटेस्ट फोन, किंमत देखील तुमच्या बजेटमध्ये!

नव्या आणि आकर्षक रंगरूपात लाँच झाला Tecno चा लेटेस्ट  फोन, किंमत देखील तुमच्या बजेटमध्ये!
HIGHLIGHTS

नव्या व्हेरिएंटला Tecno Camon 20 Avocado Art Edition असे नाव देण्यात आले आहे.

या स्पेशल एडिशनची किंमत पूर्वीप्रमाणेच 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

कंपनीने पुष्टी केली आहे की, ते Amazon वर देखील लवकरच फोन उपलब्ध होणार आहे.

Tecno Camon 20 स्मार्टफोन भारतामध्ये मे महिन्याचा शेवटी लाँच करण्यात आला. या सीरीजमध्ये दोन अन्य फोन देखील लाँच करण्यात आले होते. Camon 20 Pro 5G आणि Camon 20 Premier 5G या स्मार्टफोन्सचा सिरीजमध्ये समावेश आहे. त्यानंतर, आता काही कालावधीतच कंपनीने Tecno Camon 20 फोन एका नव्या रंगरूपात सादर केला आहे. होय, या नव्या व्हेरिएंटला Tecno Camon 20 Avocado Art Edition असे नाव देण्यात आले आहे. नावावरून तुम्हाला कळलंच असेल की, या व्हेरिएंटची डिझाईन  ऍव्होकॅडो पासून प्रेरित आहे.

Tecno Camon 20 Avocado Art Edition 

या फोनच्या नवीन एवोकॅडो आर्ट एडिशनमध्ये सेरेनिटी ब्लू कलर पर्यायाचा फॉक्स लेदर इतर व्हेरिएंटसारखाच ठेवण्यात आला आहे. मात्र, त्याचा रंग हिरवा आहे आणि त्यात ऍव्होकॅडो ग्रॅफिटी-स्टाईलचे टेक्श्चर दिले गेले आहेत.

नियमित Tecno Camon 20 भारतात प्रीडॉन ब्लॅक आणि सेरेनिटी ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. पहिल्या व्हेरिएंटमध्ये प्लास्टिक देण्यात आले आहे, तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये फॉक्स लेदर रिअर पॅनल उपलब्ध आहे.

Tecno Camon 20 Avocado Art Edition

किंमत 

 या स्पेशल एडिशनची किंमत पूर्वीप्रमाणेच 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा त्याच्या विभागातील सर्वोत्तम दिसणार्‍या हँडसेटपैकी एक असणार आहे. मात्र, हा व्हेरिएंट अद्याप Amazon वर सूचीबद्ध केलेला नाही. एवोकॅडो आर्ट एडिशन सध्या फक्त ऑफलाइन रिटेल स्टोअर्सपुरते मर्यादित आहे. परंतु कंपनीने पुष्टी केली आहे की, ते Amazon वर देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. 

Tecno Camon 20 चे तपशील 

Tecno Camon 20 स्मार्टफोन 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल. AMOLED डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, विशेषत: गडद स्क्रीन प्रदर्शित करताना ते कमी उर्जा वापरते, AMOLED डिस्प्ले स्क्रीन सामान्य डिस्प्ले स्क्रीनपेक्षा हलक्या आणि पातळ असतात. 

फोनमध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Helio G85 चिप देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही चिपसेट गेमिंगसाठी सर्वोत्तम मानली जाते. यासह फोनला पॉवर देण्यासाठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. 5000 mAh बॅटरीसह स्मार्टफोनची बॅटरी लाईफ काही बेसिक गोष्टी करताना दोन दिवसांपर्यंत टिकण्याची शक्यता आहे. 

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP मागील कॅमेरा मिळेल. अशा कॅमेऱ्याचा मुख्य फायदा असा आहे की तो तुम्हाला डिजिटल झूम (किंवा क्रॉप) करण्यास आणि पिक्सेलेशन टाळण्यास अनुमती देईल. यासह, तुम्हाला 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. 32MP कॅमेरा फोन सध्या सर्वोत्तम सेल्फी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजेच या कॅमेरा फोनसह सर्वोत्तम सेल्फी येतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo