Tecno ने आपला आतापर्यंतचा सर्वात स्टायलिश स्मार्टफोन Tecno Camon 19 Pro Mondrian Edition लाँच केला आहे. Tecno Camon 19 Pro Mondrian हा कलर बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतो. Tecno Camon 19 Pro Mondrian मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. याशिवाय यात MediaTek Helio G96 प्रोसेसर आहे. Tecno Camon 19 Pro Mondrian तीन मागील कॅमेऱ्यांसह सादर केले गेले आहे.
हे सुद्धा वाचा : WhatsApp मॅसेजवरून आता FASTagवर रिचार्ज करा, फक्त 'या' नंबरवर 'Hi' पाठवा
Tecno Camon 19 Pro Mondrian Edition मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8-इंच लांबीचा IPS LCD फुल HD+ डिस्प्ले आहे. Tecno Camon 19 Pro Mondrian एडिशनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, 8 GB LPDDR4x रॅमसह 128 GB स्टोरेज प्रदान करण्यात आले आहे. यात 5 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील मिळेल. या फोनमध्ये Android 12 सह HiOS 8.6 आहे. फोनचा बॅक पॅनल पॉलीक्रोमॅटिक फोटोआयसोमर टेक्नॉलजीसह येतो, ज्याद्वारे प्रकाश पडल्यावर फोनच्या बॅक पॅनलचा रंग बदलतो.
Camon 19 Pro Mondrian एडिशनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. बॅटरीबाबत 124 तासांच्या म्युझिक प्लेबॅकचा दावा आहे. सिंगल चार्ज केल्यानंतर तब्बल 37 दिवसांपर्यंत बॅटरी टिकणार असल्याचा दावा आहे.
Camon 19 Pro मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 64 मेगापिक्सेल आहे. त्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) देखील आहे. फोनमधील दुसरी लेन्स 50-मेगापिक्सेल पोर्ट्रेट मोड आहे आणि तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये आकर्षक सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Tecno Camon 19 Pro Mondrian Edition ची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन त्याच प्रकारात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल. Tecno Camon 19 Pro Mondrian 22 सप्टेंबरपासून Amazon India वरून विक्रीला जाईल. SBI बँक कार्ड्सवर 10 टक्के सूट मिळेल. हा फोन स्काय, सायबरपंक आणि ड्रीमी कलरमध्ये खरेदी करता येईल.