Tecno ने आपल्या स्मार्टफोन्स रेंजचा विस्तार करत एक नवीन हँडसेट 'Tecno Camon 19 Pro 5G' लाँच केला आहे. कंपनीने हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. विशेष बाब म्हणजे कंपनी फोनमध्ये 5 GB पर्यंत मेमरी फ्यूजन फीचर देखील देत आहे. हे फीचर फोनची रॅम गरज भासल्यास 13 GB पर्यंत घेते. या नवीन Tecno हँडसेटची किंमत 21,999 रुपये आहे. सीडर ग्रीन आणि इको ब्लॅक कलर पर्यायांमध्ये येत असलेल्या या फोनची विक्री 12 ऑगस्टपासून सुरू होईल.
हे सुद्धा वाचा : मस्तच ! WHATSAPP वर आले नवीन फिचर, आता कोणीही तुम्हाला ऑनलाइन पाहू शकणार नाही
फोनमध्ये, कंपनी 1080×2460 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.8-इंच फुल एचडी + LTPS डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5 GB व्हर्च्युअल रॅमसह 8 GB LPDDR4x रॅम आहे. यासह, फोनची एकूण रॅम 13 GB पर्यंत जाईल. फोनची इंटर्नल मेमरी 128 GB आहे.
प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट मिळेल. या फोनमध्ये, कंपनी हेवी गेमिंगसाठी Mali-G57 GPU सह मीडियाटेक हायपर इंजिन 2.0 ऑफर करत आहे. फोटोग्राफीसाठी रियरमध्ये LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनचा प्रायमरी कॅमेरा OIS आणि HIS सह येतो. यामध्ये 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेरासह 2 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत.
त्याबरोबरच, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. साइड-माउंटेड अँटी-ऑइल फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल-बँड Wi-Fi, 12-बँड सपोर्ट 5G, 4G LTE, OTG, NFC, ब्लूटूथ 5.0 आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.