Tech Tips: नवीन iPhone खरेदी केलाय? लगेच करा ‘हे’ काम, जाणून घ्या सर्व महत्त्वाचे टिप्स

Updated on 04-Oct-2024
HIGHLIGHTS

Apple चे iPhones जगातील सर्वाधिक विकले जाणारे उपकरण आहे.

नवीनतम iPhone 16 सिरीज स्मार्टफोन्सची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

iPhone चे बॅकपॅनल काचेचे असून त्याची स्क्रीन अधिक संवेदनशील आहे.

प्रसिद्ध टेक जायंट Apple चे iPhones जगातील सर्वाधिक विकले जाणारे उपकरण आहे. भारतीय बाजारपेठेतही या हँडसेटला मोठी मागणी आहे. जेव्हापासून नवीनतम iPhone 16 सिरीजचा स्मार्टफोन लाँच झाला आहे, तेव्हापासून सर्वत्र या फोनची चर्चा सुरु आहे. दरम्यान, दीर्घकाळापासून Android फोन वापरल्यानंतर तुम्ही अखेर iPhone खरेदी केला असेल तर, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत.

Also Read: Tech Tips: तुमच्या चुकांमुळे लवकर खराब होतात Earbuds, ‘या’ गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता

नव्या iPhone साठी विशेष टिप्स

स्क्रीन गार्ड आणि कव्हर्स

iPhone चे बॅकपॅनल काचेचे असून त्याची स्क्रीन अधिक संवेदनशील आहे. जर तुमच्या हातून हा फोन खाली पडला, तर तुमचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे ते सुरक्षित ठेवणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी तुम्ही नवा फोन खरेदी केल्यास लगेच चांगल्या दर्जाचे कव्हर आणि स्क्रीन गार्ड लावून घ्या. असे केल्याने तुमचा iPhone पडल्यास मोठे नुकसान होणार नाही.

Siri

Siri हे Apple चे व्हॉईस असिस्टंट टूल आहे. iPhone युजर्ससाठी हे अधिक महत्त्वाचे टूल आहे. याद्वारे तुम्ही तुमचा फोन कंट्रोल करण्यासोबतच कोणत्याही गोष्टीबद्दल सहज जाणून घेऊ शकता. म्हणूनच, फोन सेटअप करताना आवर्जून Siri सेटअप करा.

Apple ID

नवीन iPhone मध्ये सिम टाकल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला Apple ID बनवावी लागेल. या ID द्वारे तुम्ही फोनमध्ये सध्या Apple स्टोअर, आयक्लाउड आणि TV+ सारख्या सेवा सहज वापरता येतील.

मोबाइल ॲप्स आणि गेम्स

Apple ID तयार केल्यानंतर ॲप स्टोअरवर जा आणि तुमच्या आवडीचे मोबाइल ॲप्स आणि गेम्स डाउनलोड करा. यामुळे फोन नियंत्रित करणे खूप सोपे होईल. तुम्हाला तुमचा आयफोन अँड्रॉइड फोनप्रमाणे कस्टमाइज करायचा असेल तर, तुम्हाला स्टोअरवर अनेक कस्टमायझेशन ॲप्स देखील मिळतील. अँड्रॉइडप्रमाणेच ॲप स्टोअरमध्येही अनेक ॲप्स आहेत, जे मोफत डाउनलोड करून वापरता येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :