TCL ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन TCL 562 लाँच केला आहे आणि ह्याची किंमत १०,९९० रुपये आहे. त्यासोबत कंपनीने एक 43 इंचाचा P1 अल्ट्रा HD सीरिजचा टीव्ही लाँच केला आहे, ज्याची किंमत ३१,९९० रुपये आहे. त्याशिवाय कंपनीने TCL 48 इंचाचा P1 कर्व्ह्ड FHD सीरिजचा टीव्ही लाँच केला आहे, ज्याची किंमत ३७,९९० रुपये आहे. त्याशिवाय 32 इंचाचा D2900 आणि 40 इंचाचा D2900 सुद्धा क्रमश: १३,९९० रुपये आणि २०,९९० रुपयात लाँच केले गेले आहे. आपण ह्या सर्व प्रोडक्ट्सला ३ ऑगस्टपासून अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून खरेदी करु शकता.
TCL 562 स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5.5 इंचाच्या FHD IPS डिस्प्लेसह मिडियाटेक हेलिओ P10 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमसुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
तसेच ह्यात 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. फोनमध्ये आपल्याला 2900mAh क्षमतेची बॅटरी सुद्धा मिळत आहे. हा स्मार्टफोन 4G सपोर्ट आहे आणि हा अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो.
हेदेखील वाचा – फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…
ह्यात आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे. ह्यासोबत कंपनीने आपले काही आकर्षक टीव्हीसुद्धा लाँच केले आहेत.
हेदेखील वाचा – अॅप्पल आयफोन 7 ची आणखी काही फोटोज झाले ऑनलाइन लीक
हेदेखील वाचा – शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन लाँच, 4GB रॅमने सुसज्ज