स्मार्टफोन निर्माता कंपनी TCL ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन TCL 560 लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ७,९९९ रुपये ठेवली आहे. हा ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे .
TCl 560 स्मार्टफोनमध्ये ग्लॉसी मेटल बॉडी दिली आहे. हा गडद राखाडी आणि सोनेरी रंगात उपलब्ध आहे. ह्याची जाडी 7.99mm आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची हाय डेफिनिशन डिस्प्ले दिली आहे. हा फोन 2GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 210 क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा अॅनड्रॉईड मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स
ह्या फोनमध्ये 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात ब्लूटुथ, GPS, AGPS, 4G, VoLTE सारखे फीचर्स आहेत. कंपनीचा दावा आहे की, ह्या फोनची बॅटरी 525 तासांचा स्टँडबाय टाईम देते.
हेदेखील वाचा – “फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा
हेदेखील वाचा – HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी