Swipe Virtue स्मार्टफोन लाँच

Updated on 25-Jan-2016
HIGHLIGHTS

स्वाइप टेक्नॉलॉजीने आपला नवीन स्मार्टफोन Swipe Virtue ५,९९९ रुपयात सादर केला आहे. हा स्मार्टफोन आपण एक्सक्लूसिव्हली स्नॅपडिलच्या माध्यमातून घेऊ शकता.

स्वाइपने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Swipe Virtue आणला आहे. ५ इंचाची डिस्प्ले असलेल्या ह्या स्मार्टफोनला ५,९९९ रुपयात लाँच केले गेले आहे. आपण ह्या स्मार्टफोनला स्नॅपडीलच्या माध्यमातून एक्सक्लूसिव्हली घेऊ शकता.

स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर आधारित आहे. हा एक ड्यूल-सिम स्मार्टफोन आहे. ह्यात ५ इंचाची IPS HD डिस्प्ले 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनसह दिली गेली आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 320ppi आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसरसुद्धा आहे. त्याचबरोबर ह्यात 2GB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे, ज्यातील १२.४८GB यूजर्सच्या वापरासाठी आहे. आपण ह्याला 32GB पर्यंत वाढवू शकतो.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 8MP चा ऑटोफोकस रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. फोनमध्ये 2500mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे. जी कंपनीनुसार ८ तासांचा टॉकटाइम आणि २५० तासांचा स्टँडबाय टाइम देण्यास सक्षम आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 3G, GPRS/EDGE, वायफाय सह हॉटस्पॉट फंक्शनलिटीसुद्धा दिली गेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ब्लूटुथ, FM रेडियो, मायक्रो-USB 2.0, आणि GPS/A-GPS सपोर्ट दिला गेला आहे.

ह्याआधी स्वाइपने लहान मुलांसाठी स्वाइप जुनियर नावाचा स्मार्टफोन आणला होता. हा स्मार्टफोन पॅरेंटल कंट्रोल फीचरने सुसज्ज आहे आणि हा 5-15 वयोगटातील मुलांसाठी बनवला गेला आहे. स्मार्टफोन SOS फीचरने सुसज्ज आहे, ज्याचा वापर केल्यावर डिवाइस स्वत: एक निर्धारित नंबरवर कॉल करेल. हा हँडसेट शॉक प्रूफ केससह येतो.

हेही वाचा- लेनोवो वाइब X3 स्मार्टफोन २७ जानेवारीला होणार लाँच

हेही वाचा- आसूसचा पेगासूस 5000 स्मार्टफोन झाला लाँच

हा स्लाइडशो पाहा- मेटल बॉडी सह येणारे भारतातील काही आकर्षक स्मार्टफोन्स

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :